8 March 2021 9:26 PM
अँप डाउनलोड

इराणचं प्रवासी विमान कोसळून ६६ जणांचा मृत्यू.

इराण : एटीआर ७२ हे इराणचं प्रवासी विमान दक्षिण इराणमध्ये कोसळून ६६ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. सर्च ऑपरेशन युद्धपातळीवर सुरु आल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तवाहिनीने दिलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

हे विमान तेहरानहून यासुस कडे निघालं होतं. परंतु इस्फहान प्रांतादरम्यान त्या विमानाचा रडारशी संपर्क तुटल्याचे समजते. त्यामुळे युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरु होते आणि अखेर या विमानाचे अवशेष सेमिरॉम शहराच्या हद्दीत डोंगराळ भागात सापडले आहेत.

हे अपघातग्रस्त प्रवासी विमान इराणीयन एअरलाइन्सचं समोर आलं आहे. ज्या भागात ह्या विमानाचे अवशेष सर्च ऑपेरेशन दरम्यान सापडले आहेत त्या भागात दाट धुके असल्याने सर्च ऑपेरेशन दरम्यान खूप अडथळे येत आहेत. परंतु हे प्रवासी कोसळण्याचे नेमके कारण अजून समजू शकले नाही.

एअर प्लेन क्रश ने ट्विट करून त्या अपघातग्रस्त विमानाचा फोटो ट्विटर वर प्रसिध्द केला आहे.

हॅशटॅग्स

#Iran Aircraft Crash(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x