23 November 2019 8:04 AM
अँप डाउनलोड

पत्रकार रविकांत कांबळेच्या मुलीच आणि आईच अपहरण करून क्रूर हत्या.

नागपूर : नागपूर मध्ये आज एक धक्कादायक घटना घडली असून त्यात नागपूर टुडे या वेबसाईटचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या चिमुकल्या मुलीची आणि आईची नागपुरात अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण नागपुरात खळबळ उडाली आहे.

या हत्याकांडात मृत पावलेल्या व्यक्ती आजी उषा कांबळे आणि नातं राशी कांबळे अशी नावे असल्याचे समजते. काल रात्रीपासूनच या दोघी बेपत्ता होत्या आणि आज दिघोरी नाक्याजवळ या आजी आणि नातीचे मृतदेह सापडले.

मृतांपैकी राशी कांबळे ही लहान मुलगी नागपूर टुडे या वेबसाईटचे पत्रकार रविकांत कांबळे यांची मुलगी असून उषा कांबळे या त्यांच्या आई असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

संपूर्ण नागपूर हलवून टाकणाऱ्या घटनेचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून, पोलीस पुढची तपासणी करत आहेत. काळ या दोघींचे उमरेड परिसरातील संजूबा हायस्कुल जवळून अपहरण करण्यात आले होते. अखेर आज त्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत.

हॅशटॅग्स

#Nagpur Police(2)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या