बुलढाणा : राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव येथे १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान पश्चिम विदर्भातील कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याच पश्चिम विदर्भातील कृषी महोत्सवाचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

त्याच दरम्यान उपस्थितांना संबोधताना मुख्यमंत्री विरोधकांच्या ‘पकोडा रोजगार’ आंदोलनावर बोलताना म्हणाले की, मोदींच्या नावाने पकोडे तळनाऱ्या विरोधकांना पुढची १५ ते २० वर्ष केवळ पकोडेच तळावे लागणार असल्याची खोचक टीका मुखमंत्र्यांनी विरोधकांवर केली.

तसेच विरोधकांकडे मोदींच्या पकोडा रोजगारावर टीका करण्याशिवाय दुसरी कामेच उरलेली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आणि म्हणूनच ते केवळ मोदींच्या नावाने राज्यभर पकोडे तळत आहेत असा खोचक टोला लगावला. जर विरोधकांना स्किल डेव्हलोपमेंट च्या माध्यमातून पकोडे कसे तळायचे हे शिकायचे असेल तर राज्य सरकार ते शिकवण्यासाठी तयार असल्याचे मुख्यमंत्री मिश्कीलपणे म्हणाले.

CM Devendra Fadanvis on opponents at Buldhana