19 July 2019 9:45 AM
अँप डाउनलोड

नागपूर विद्यापीठात आता शिकविणार आरएसएस'चा इतिहास

नागपूर विद्यापीठात आता शिकविणार आरएसएस’चा इतिहास

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. देशाच्या उभारणीत संघाचे स्थान यावर विद्यार्थ्यांना ‘बीए’(इतिहास)च्या चौथ्या सत्रात सदर विषयाला अनुसरून धडे शिकविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत त्या जागेवर ‘कम्युनॅलिझम’चा विकास या मुद्याला स्थान होते. मात्र नागपूर संघाचे मुख्यालय असून आणि मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत बहुमताने वीजमं होताच, पहिल्यांदाच अशा प्रकारचा बदल झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागपूर विद्यापीठातील ‘बीए’(इतिहास)च्या अभ्यासक्रमात यावर्षी बदल करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपर्यंत दुसऱ्या वर्षातील चतुर्थ सत्रात ‘भारताचा इतिहास १८८५-१९४७’ या पेपरमध्ये तिसऱ्या ‘युनिट’मध्ये ‘कम्युनॅलिझम’चा उदय व विकास, क्रिप्स मिशन व कॅबिनेट मिशन प्लॅन या तीन मुद्यांना स्थान होते. परंतु आता बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ‘कम्युनॅलिझम’च्या जागेवर देशाच्या उभारणीत आरएसएस या मुद्याला महत्वाचे स्थान मिळाले आहे असं म्हटलं जातं आहे. विशेष म्हणजे संपूर्ण पेपरमधून ‘कम्युनॅलिझम’चा इतिहासच पूर्णपणे वगळण्यात आला आहे. या सत्रापासून विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत हे धडे शिकविण्यात येणार आहेत. विद्यापीठाने संकेतस्थळावरदेखील नवीन अभ्यासक्रम देखील आधीच ‘अपडेट’ केला आहे.

यासंदर्भात मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शर्मा यांना विचारणा केली असता यात कोणतेही राजकारण नसल्याची पुष्टी केली आहे. ‘एमए-इतिहास’च्या अभ्यासक्रमात अगोदरपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत शिकविण्यात येत आहे. ‘एमए’च्या चतुर्थ सत्रात ‘आधुनिक विदर्भाचा इतिहास’ या पेपरला चौथ्या ‘युनिट’मध्ये संघाचा मुद्दा आहे. विदर्भातील सर्वच मोठ्या संघटनांचा अभ्यास यात करण्यात येतो. पदवी पातळीवरदेखील विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी यासाठी ‘बीए’मध्ये बदल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Mohan Bhagwat(5)#RSS(26)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या