5 August 2021 3:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा उत्तर प्रदेश निवडणुक २०२२ | प्रियांका गांधी यांच्यासंबंधित 'तो' जुना सल्ला काँग्रेस आता गांभीर्याने घेणार?
x

फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल - भास्कर जाधव

MLA Bhaskar Jadhav

रत्नागिरी, ३० जून | मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही पेटला आहे. याच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी यांनी चांगलाच समाचार घेतलाय. आमच्या हाती सूत्र द्या, चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत नाही केलं तर राजकारणातून संन्यास घेईन, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

गेली दोन वर्षे राज्य सरकार कोरोना महामारीचा सामना करत आहे. अशातच देवेंद्र फडणवीस फक्त त्रास देण्याचं काम करत आहेत. राजकारणात आतापर्यंत पाहिलं आहे की राज्यावर कोणतंही संकट आलं तर सर्वजण पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येतात आणि संकटांचा सामना करतात. मात्र, दोन वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी फक्त त्रास देण्याचा काम केलं आहे. त्यामुळे माझ्या मते त्यानी राजकारणातुन संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच तरी संपले. त्यामुळे फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

नाना पटोलेंचाही फडणवीसांवर निशाणा:
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारा भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी दिली असती तर ही वेळच आली नसती. पण भाजपाने ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. आता मात्र भाजपा नेते ओबीसींचा कळवळा असल्याचे दाखवत आहेत, असा टोला नाना पटोले यांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena MLA Bhaskar Jadhav criticized Devendra Fadnavis over his statement on OBC reservation news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x