4 October 2023 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रसाठी दमदार आर्थिक अपडेट, बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर, पुढे मजबूत कमाई Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉकमध्ये आणखी किती ताकद शिल्लक? SBI Life Insurance Scheme | SBI लाईफ इन्शुरन्सची ही योजना मुलांच्या शिक्षण ते लग्नापर्यंतच्या आर्थिक चिंतेतून मुक्त करेल, डिटेल्स पहा Yes Bank Share Price | येस बँकेने दिली महत्त्वाची माहिती, येस बँक शेअर प्राईसवर नेमका काय परिणाम होणार? तज्ज्ञ काय सांगतात? Tata Technologies IPO | तयार राहा! अशी संधी पुन्हा मिळणार नाही, टाटा टेक्नॉलॉजी IPO बाबत मोठी बातमी, GMP ने लॉटरीचे संकेत IRFC Vs Jupiter Wagons Share | बापरे! ज्युपिटर वॅगन्स शेअरने 3 वर्षात 4300 टक्के परतावा दिला, अक्षरशः पैशाचा पाऊस पडतोय हा शेअर Multibagger Stocks | सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत 124% परतावा दिला, मजबूत कमाई करण्याची संधी
x

भारतातील वाढत्या उष्म्यात कोरोनाचा प्रभाव जास्त वाढणार नाही: अमेरिकन वैज्ञानिक

नवी दिल्ली, ०१ एप्रिल: कोरोना विषाणूमुळे अमेरिकेतील सुमारे दोन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे या विषाणूविरोधात लढणाऱ्या तेथील दोन वैज्ञानिकांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या टास्क फोर्सचे सदस्य अँथनी फोसी आणि डेबोराह बिरक्स म्हणाले की, अमेरिकेत शाळा, रेस्तराँ, सिनेमा आणि सर्व हालचाली बंद करुन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सूचनांचे पालन करुनही १ लाख ते २ लाख ४० हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो.

या दोघांनी इशारा देत म्हटले आहे की, जर काहीच केले नाही तर अमेरिकेत १.५ मिलियन ते २ मिलियनपर्यंत मृत्यूचा आकडा वाढू शकतो. डेबोराह बिरक्स यांनी एक तक्ता सादर करत म्हटले की, देशात या आजारामुळे एक लाख ते २ लाख ४० हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो. सोशल डिस्टन्सिंग काम करत आहे आणि त्याचा चांगला परिणामही दिसत आहे. कदाचित हिच आतापर्यंतची सर्वांत चांगली रणनीति आहे, असेही त्यांनी म्हटले.

दुसरीकडे जगभरात दररोज वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं वैज्ञानिकांनाही बुचकळ्यात टाकलं आहे. शास्त्रज्ञ आपापल्या परीनं यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतात बदलत्या वातावरणामुळे कोरोनाचा प्रभाव जास्त वाढणार नसल्याचाही वैज्ञानिकांचा दावा आहे. न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एनआयटी)नुसार, भारतात वाढत चाललेल्या उष्म्यात हा विषाणू फार काळ टिकून राहू शकत नाही. थंड प्रदेशात हा विषाणू जास्त काळ टिकून राहतो. त्यामुळे भारतात याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होणार नाही. भारतापेक्षा कोरोना व्हायरसनं स्पेन, इटली आणि अमेरिकेत हाहाकार माजवला आहे.

कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी या लसीचा प्राथमिक टप्प्यात प्रयोगही सुरू करण्यात आला आहे. देशातही १९६२मध्ये नॅशनल टीबी प्रोग्रामअंतर्गत ही लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. याचा अर्थ असा आहे की, भारतातल्या बहुसंख्याकांना ही लच आधीच टोचण्यात आलेली आहे. त्यामुळेदेखील भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होणार नसल्याचा वैज्ञानिकांना विश्वास आहे.

 

News English Summary: On the other hand, the increasing number of coronary patients worldwide is also alarming scientists. Scientists are trying to find solutions to their own experiments. Scientists claim that the changing environment in India will not exacerbate Corona’s influence. According to the New York Institute of Technology (NIT), the rising heat wave in India cannot last long. In cold regions, the virus can survive for a long time. Therefore, the outbreak in India will not be very large. Corona virus is more prevalent in Spain, Italy and the United States than India. The vaccine has also been launched in the early stages of the fight against Corona. The vaccine was started in the country in 1962 under the National TB Program. This means that the majority of the population in India has already been sucked in. Scientists believe that Corona will not be infected in India too.

 

News English Title: Story Corona Crisis India covid 19 New York institute of Technology Study research News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x