9 May 2021 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
थोडी जरी लाज शिल्लक असेल तर देशाची जाहीर माफी मागा | केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा - पी. चिदंबरम इतिहास घुसमटला | दिल्ली इंडिया गेटच्या श्वास आणि देशवासीयांचा श्वास एकाच वेळी घूसमटत आहे कोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू मोदी भक्तांनो! तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले - लेखिका विनिता मोक्किल सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांकडून राज्याची स्तुती | पण फडणवीसांना बनवाबनवीची शंका Health First | तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या दैनंदिन गोष्टीत हे बदल करा केंद्र सरकारचा ढिम्म कारभार | अखेर सुप्रीम कोर्टाकडून १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना
x

हाउडी मोदी इव्हेन्ट आणि प्रचंड पैसा वाया जाणार | आता बायडेन सरकारसाठी जुळवा जुळवी?

US Presidential Election 2020, Joe Biden, White house, PM Narendra Modi

नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर: काही महिन्यांपूर्वी भारतात आणि तत्पूर्वी अमेरिकेत निवडणुकीच्या अनुषंगाने आणि अमेरिका स्थित भारतीय मतदारांच्या मतांसाठी हाउडी मोदी इव्हेन्ट सारखे मेगा इव्हेन्ट आयोजित केले होते. अगदी थेट परदेशातून लाईव्ह शो देखील करण्याचे जणू काही माध्यमांना आदेशच होते. मात्र सध्याची अमेरिकेतील निवडणुकीची स्थिती पाहता डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी या दोघांचं राजकरण फोल ठरलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतातही ट्रम्प यांच्या इव्हेंटसाठी गुजरात सरकारने मोठा खर्च केला आणि त्यासाठी गुजरातच्या विकासाचं फसवं मॉडेल भिंतीआड दडविण्यासाठी विशेष खर्च केला होता. यामध्ये अमेरिकेशी संबंध सुधारण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय नेते बनण्याची भूक अधिक असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं होतं. आज मोदींच्या नावाने प्रोमोशन करणारे सर्व परदेशातील नेते त्यांच्या देशात निवडणुकीनंतर तोंडघशी पडले आहेत किंवा त्यांच्या राजकारणाचा समतोल बिघडला आहे. त्यात इस्राईल सारखा देश सुद्धा आहे.

दरम्यान, ओबामांनंतर ट्रम्प यांचं रिपब्लिकन सरकार आलं आणि हे संबंध तोलामोलाचेच राहिले. आता पुन्हा एकदा अमेरिकेत जो बायडेन यांचं डेमोक्रॅटिक सरकार येण्याच्या मार्गावर आहे. व्हाइट हाउसमध्ये होणाऱ्या बदलांच्या अंदाजाने भारतातील मोदी सरकारने सुद्धा नव्या संबंधांची चाचपणी पूर्वीच सुरू केलेली आहे.

अमेरिकेत परिस्थिती बदणार याचा अंदाज आल्याबरोबर भारताचे अमेरिकेतले उच्चायुक्त तरणजितसिंग सिद्धू यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांबरोबर बैठका आयोजित करून चर्चा सुरू केली आहे. यातल्या काही बैठका औपचारिक स्वरूपाच्या आणि माध्यमांपर्यंत पोहोचलेल्या आहेत, तर अनेक बैठका अनौपचारिक स्वरूपाच्या झालेल्या आहेत.

 

News English Summary: A few months ago, a mega event like the Howdy Modi event was organized in India and earlier in the US in connection with the elections and for the votes of Indian voters based in the US. It was as if the media was ordered to do live shows even from abroad. But given the current state of elections in the United States, the politics of both Donald Trump and Modi have been a fallacy. In India, too, the Gujarat government has spent heavily on Trump’s event, with special spending to cover up the deceptive model of Gujarat’s development. Political analysts had said that the desire to become an international leader was more important than improving relations with the United States. Today, all the foreign leaders who are promoting in the name of Modi have either fallen head over heels in their country after the elections or their politics has lost its balance. It also includes a country like Israel.

News English Title: US Presidential Election 2020 Joe Biden in white house how PM Narendra Modi government plan to strengthen America India relation News Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1526)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x