21 November 2019 7:25 AM
अँप डाउनलोड

युतीतील बोलणी न होण्यास शंभर टक्के शिवसेनाच जवाबदार: देवेंद्र फडणवीस

Shisvena, BJP Maharashtra

मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस झाले तरी अद्यापही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. शिवसेना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून भाजप हे पद सोडण्यास तयार नाही. त्यामुळं अभूतपूर्व सत्ताकोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे आपापल्या परीनं प्रयत्न सुरू असल्यानं राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत.

सत्तास्थापनेत मोठी कोंडी निर्माण झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी प्रसार माध्यमांनी माहिती देताना ते म्हणाले की, राज्यपालांनी त्यांना अजून काही काळ काळजीवाहू मुख्यमंत्रीपदी विराजमान राहण्याचे आदेश दिले आहेत, तसेच कोणताही नवीन निर्णय घेता येणार नाही असं म्हटलं आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी पूजनिय आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याकडून त्यांचा अपमान होणे शक्य नाही. मागील ५ वर्षांत विरोधात लढलो तेव्हाही आमच्या नेत्यांनी टीका केली नाही. अगदी नरेंद्र मोदींनीही नाही. पण गेल्या पाच वर्षांत आणि गेल्या १० दिवसांत मोदींवर शिवसेनेकडून खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. दोन्ही ठिकाणी सत्तेत रहायचे आणि टीका करायची आम्हाला कधीही मान्य नाही. मोदीवर अशा प्रकारची काँग्रेसनेही केली नाही. ही टीका आमच्या जिव्हारी लागली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

छोट्या छोट्या राज्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी अमित शहा यांनी पुढाकार घेतला. मग महाराष्ट्रात का आले नाहीत अशी चर्चा गेल्या काही काळात सुरू झाली होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी पहिल्याच दिवशी आमचे सत्ता स्थापनेचे मार्ग खुले असल्याचे म्हटले. त्यांनी 50-50 टक्के सत्तेत वाटा असे बोलले असते तर चालले असते. पण त्यांन केलेले वक्तव्य धक्का देणारे होते. एखादी चर्चा जेव्हा अंतिम टप्प्यात येते तेव्हाच राष्ट्रीय अध्यक्ष किंवा मोठा नेता येतो आणि त्यावर शिक्कामोर्तब करतो. लोकसभेवेळी असेच झाले होते. मात्र, जेथे चर्चाच सुरू झाली नाही तेथे शहा कसे येतील? असा सवाल करत त्यांनी स्पष्टीकरण दिले.

तसेच शिवसेनेसोबत समसमान सत्तावाटपाबाबत काहीही ठरलं नव्हतं आणि लवकरच भाजपचाच मुख्यमंत्री बनेल असा विश्वास व्यक्त केला. मात्र यावेळी त्यांचा मुख्य रोख हा शिवसेनेने मोदींचा वेळोवेळी कसा अपमान केला याची आठवण करून दिली आणि विरोधी पक्ष, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे तसेच प्रसार माध्यमांचे देखील आभार मानले आणि यावरून भाजप-शिवसेनेत अभूतपूर्व दरी निर्माण झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.

दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्री निवासस्थानी जी चर्चा झाली होती त्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा होता, असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मराठी ब्रीफिंग संपल्यानंतर हिंदी ब्रीफिंग सुरू असतानाच पत्रकारांशी संवाद साधून राऊत यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व दावे फेटाळले.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(349)#Shivsena(751)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या