4 December 2024 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL
x

Horoscope Today | या 6 राशींसाठी उघडणार प्रेमाचे दरवाजे, चांगल्या जोडीदाराचा योग लाभेल, पहा तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today

Horoscope Today | आज एकूण 6 राशींना जोडीदार लाभण्याचा योग आहे. त्याचबरोबर अनेकांना मोठ्या जबाबदाऱ्या हाताळण्याची संधी मिळू शकते. जाणून घ्या आजचे राशिभविष्य.

मेष :
मेष राशी असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस थोडा धकाधकीचा असणार आहे. धावपळीमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ऍसिडिटी आणि पित्ताचा त्रास जास्त वाढू शकतो. त्यामुळे आज विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

वृषभ :
वृषभ राशींच्या आयुष्यात प्रेमाचा जोडीदार लागण्याचे योग जुळून आले आहे. या राशींच्या व्यक्तींसाठी त्यांनी सर्वातआधी केलेल्या जुन्या कामांचं फळ त्यांना मिळणार आहे. आवडत्या व्यक्तीबरोबर भेटीगाठी देखील वाढू शकतात.

मिथुन :
मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपल्या जोडीदाराविषयी खास काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्यामुळे आपल्या जोडीदाराचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. सोबतच जुन्या आणि जवळच्या व्यक्तींचं चांगलं सहकार्य लाभु शकतं.

कर्क :
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अतिशय फलदायी आहे. घरी अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे. पाहुण्यांमध्ये तुमचा दिवस अतिशय रममान जाईल. चांगल्या भविष्यासाठी भगवान शिव-शंकर यांची उपासना करणे फायद्याचे ठरेल.

सिंह :
सिंह रास असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात आज प्रेमाचा योग आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर बाहेर डेटवर जाऊ शकता. दरम्यान सिंह राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होऊ शकतो. परंतु हा धनलाभ वाईट मार्गातून आलेला पैसा नसावा याची काळजी घ्या.

कन्या :
कन्या राशीसाठी आजचे भविष्य असं सांगते की, कोर्टकचेरीची अर्धवट कामे आज मार्गी लागतील. मोठ्या कामांची जबाबदारी घेण्यापेक्षा साधी आणि सरळ कामे करा दिवस चांगला जाईल. सोबतच प्रेमाचा उपयोग ओढवण्याची देखील शक्यता आहे.

तुळ :
तूळ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आज चमत्कारिक गोष्ट घडू शकते. दरम्यान आजचा दिवस धावपळीचा ठरू शकतो. अचानक एखादं कामही येऊ शकतं. वाईट गोष्टींपासून सावधानी बाळगा.

वृश्चिक :
वृश्चिक राशींसाठी आजचा दिवस अत्यंत आनंददायी असणार आहे. प्रॉपर्टीच्या बाबतीत चांगल्या गोष्टी कानावर पडतील. आज वृश्चिक राशींनी भगवान शिवशंकर यांची पूजा आणि उपासना करणे फायद्याचे ठरेल.

धनु :
आज घरामध्ये चांगल्या गोष्टी घडण्याचा योग आहे. प्रॉपर्टी संबंधी थकलेली कामे मार्गी लागतील. आज धनु राशीसाठी दिवस अत्यंत चांगला असणार आहे. सोबतच आयुष्यामध्ये एका नव्या व्यक्तीची एन्ट्री होऊ शकते. विनाकारण कोणाच्या वाटेला जाऊ नका.

मकर :
मकर राशींसाठी आजचा दिवस फलदायी असून सहकार्याकडून कौतुकाची थाप मिळू शकते. दोन भावंडांमधील अनेक वर्षांपूर्वीचा जुना अबोला आज मिटेल.

कुंभ :
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ दिवस असणार आहे. या राशींचा कुटुंबीयांबरोबर चांगला वेळ जाईल. दरम्यान कुटुंबीयांकडूनच प्रॉपर्टी निगडित चांगली बातमी कानावर येईल. ज्यामध्ये तुमचाही लाभ असेल.

मीन :
मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत उत्स्फूर्त असणार आहे. जीवनात काहीतरी नवीन करण्याचा विचार आणि निर्णय आज होऊ शकतो. स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा चांगले फळ मिळेल.

Latest Marathi News | Horoscope Today 17 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(840)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x