
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर्सच्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने (NSE: RELIANCE) फ्री बोनस शेअर्स देण्यासाठी 28 ऑक्टोबर 2024 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. 28 ऑक्टोबर 2024 तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स असतील त्यांना एका शेअरवर एक फ्री बोनस शेअर देण्यात येणार आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची सध्याची स्थिती
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर शेअरमध्ये घसरण झाली आहे. मात्र, बुधवारी शेअर 0.79 टक्क्यांनी वाढून 2709.40 रुपयांवर बंद झाला होता. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.59 टक्के वाढून 2,724.10 रुपयांवर पोहोचला होता.
एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – ‘ADD’ रेटिंग
एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘ADD’ रेटिंग दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ३३५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
नोमुरा ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
नोमुरा ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 3,450 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
यूबीएस ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
यूबीएस ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ३,२५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. तसेच 3125 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.