5 June 2023 12:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | झटपट पैसा! एक आठवड्यात 73 टक्के पर्यंत बंपर परतावा देतं आहेत हे शेअर्स, लिस्ट सेव्ह करा Alkyl Amines Chemicals Share Price | करोडपती स्टॉक! अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरने गुंतवणुकदारांना 60000 टक्के परतावा दिला Anmol India Share Price | मालामाल शेअर! अनमोल इंडिया शेअरने 843% परतावा दिला, आता एका शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स मिळणार My EPF Money | पगारदारांनो! EPF कट होतं असेल तर लक्ष द्या, हे लोकच काढू शकतात पैसे, या कागदपत्रांची असेल गरज Loksabha Election 2024 | 2024 लोकसभेसाठी 9 वर्षात गमावलेल्या मित्रपक्षांपुढे भाजप हात पसणार, भाजप गुजरात लॉबीवर कोण विश्वास ठेवणार? Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी झाले, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या Sulochana Didi | निरागस अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचे वृद्धापकाळाने निधन, त्या ९४ वर्षांच्या होत्या
x

Marathwada Flood | फडणवीस सरकारच्या काळातच वाळू उपसा वाढला | जयंत पाटलांचं प्रतिउत्तर

Marathwada flood

नाशिक , ०४ ऑक्टोबर | नद्यांना मोठा पूर येण्यामागे आणि त्यातील होणाऱ्या नुकासानाला वाळू उपसा कारणीभूत ठरला आहे. तसेच, या वाळू माफियांना महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाळू उपसा हा देवेंद्र फडणवीसांच्या काळातच (Marathwada Flood) जास्त वाढला असा पलटवार केला आहे. आता तर त्यावर काही एनजीटी (National Green Tribunal Act) सारखे कायदे आलेले आहेत. त्याबाबत आघाडी सरकार गंभीर आहे, असही त्यांनी यावेळी सांगितले आहे. ते नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.

Marathwada Flood. Water Resources Minister Jayant Patil countered that sand extraction increased during the time of Fadnavis government :

सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत देणार:
आज जी मोठ्या प्रमाणावर नदीपात्रातून वाळू काढण्याचे प्रकार सुरू आहेत, त्यामुळे नदीपात्रात पाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे गेली 5, 6 वर्ष झालेला परिणाम असल्याचे नामदार पाटील यांनी सांगितले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाले असून, सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

पाटील यांनी नांदगावला आल्यानंतर पुराने नुकसान झालेल्या भागाला भेट देऊन पाहणी केली. जयंत पाटील पहिल्यांदाच नांदगाव मतदारसंघात आले होते. त्यामुळे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. भुजबळ-कांदे वाद अजूनही सुरू असताना आमदार कांदे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागताचे होर्डिंग लावून शिवसेना कार्यकर्त्यानी त्यांचे जोरदार स्वागत केल्यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Marathwada flood minister Jayant Patil reply over allegations of Fadnavis.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x