23 March 2023 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Realme Narzo 50 5G | रियलमी Narzo 50 5G स्मार्टफोनवर 26% डिस्काउंट, जबरदस्त ऑफर्सबद्दल जाणून घ्या Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा SBI Share Price | सरकारी एसबीआय बँकेचा शेअर तेजीत येतोय, शेअरची वाटचाल आणि टार्गेट प्राईस पाहून घ्या
x

Marathwada Mukti Sangram | मुख्यमंत्र्यांच्या मराठवाड्यासाठी 24 मोठ्या घोषणा - सविस्तर माहिती

Marathwada Mukti Sangram

औरंगाबाद, १७ सप्टेंबर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबादेत आहेत. त्यांनी औरंगाबाद दौऱ्यात मराठवाड्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन त्यांनी केले. यावेळी भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी संतपीठ स्थापन करण्याची घोषणा केली. यासोबतच निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी 24 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

Marathwada Mukti Sangram, मुख्यमंत्र्यांच्या मराठवाड्यासाठी 24 मोठ्या घोषणा – CM Uddhav Thackeray made 24 announcements of the day of Marathwada Mukti Sangram :

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा:

  1. औरंगाबाद जिल्हा परिषदेकडील १४४ निजामकालीन शाळा आणि वर्ग खोल्या नव्यानं बांधणार
  2. पैठण येथील संतपीठाचे अभ्यासक्रम सुरू करणार. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जबाबदारी
  3. परभणी येथे २०० बेड्सचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
  4. उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयाचे कामही वेगाने सुरू
  5. सिंथेटिक ट्रॅकचे काम औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे
  6. हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी निधी
  7. औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना
  8. औरंगाबाद-शिर्डी हवाई सेवेची चाचपणी
  9. सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये
  10. औरंगाबाद : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७.२२ कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून
  11. परभणी शहरात भुयारी गटार योजनेच्या कामासही गती. ३५० कोटी रुपये
  12. परभणीसाठी अतिरिक्त पाणीपुरवठा योजना जलजीवन अभियानातून. १०५ कोटी रुपये
  13. उस्मानाबाद शहराची १६८.६१ कोटी रकमेची भूमिगत गटार योजना
  14. औरंगाबाद : १६८० कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश
  15. हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग -४.५० कोटी
  16. औरंगाबाद – शिर्डी या ११२.४० किमी मार्गाची श्रेणीवाढ
  17. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या १९४.४८ किलोमीटरच्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देणार
  18. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतिवन प्रेरणादायी होईल असे उभारणार
  19. औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार
  20. मराठवाड्यात येत्या वर्षात जवळपास २०० मेगावॅट सौर प्रकल्प उभारणार
  21. औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया वेगाने करावी असे निर्देश
  22. घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास. वाढीव २८ कोटी रुपये खर्च
  23. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास. ८६.१९ कोटी रुपये खर्च येईल.
  24. नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास. ६६.५४ कोटी रुपये खर्च.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: CM Uddhav Thackeray made 24 announcements of the day of Marathwada Mukti Sangram.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x