3 May 2024 4:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

आ. प्रताप सरनाईकांना अडचणीत आणणाऱ्यांनो, त्यांच्या कामाशी स्पर्धा करून दाखवावी - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मीरा रोड, १० ऑगस्ट | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठराखण केली. जे कोणी प्रताप सरनाईकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी प्रताप यांच्या लोकोपयोगी कामाशी स्पर्धा करून दाखवावी, असं आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं.

प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मीरा रोड येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आव्हान दिले. जे कोणी प्रताप सरनाईकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतील आणि आहेत त्यांनी प्रतापच्या या लोकोपयोगी कामाशी स्पर्धा करून दाखवावी. करा ना… स्पर्धा करा… पण अशी स्पर्धा करा. त्याला आपण हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतो, असं मुख्यमंत्री म्हणाले

पुढे मुख्यमंत्री म्हणाले कि, “तुमच्या मागे काही करंटे लोक लागलेले असताना देखील जराही न डचमळता आपल्या सेवेचा वसा तुम्ही सुरू ठेवला. हीच शिवसेना आणि शिवसैनिकांची जिद्द आहे. त्याला जागून तुम्ही जनतेच्या हितासाठी खंबीपणे काम करत चालला आहात, असं सांगतानाच क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाज किंवा गोलंदाज चांगली बॅटिंग करतो, तेव्हा असं काही आजुबाजूला करायचं की त्याचं लक्ष विचलीत होतं. त्याच्या बॉलिंगची लेन्थ आणि लाईन चुकते आणि बॅट्समन सुद्धा डचमळतो. त्यामुळे तो आऊट होतो. तसाच हा घाणेरडा प्रकार आता या क्षेत्रात येत चालला आहे. आला आहे. तुम्ही त्यांच्या कामाने चोख उत्तर दिलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सरनाईक यांचं कौतुक केलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: CM Uddhav Thackeray criticized opposition over ED action against MLA Pratap Sarnaik news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x