29 March 2024 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार?
x

संजय राऊत हे शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर अंकुश ठेवावा: आ. रवी राणा

Shivsena, Uddhav Thackeray, MLA Ravi Rana, MP Sanjay Raut

मुंबई: सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल दहा दिवस उलटले असले तरी अजून पर्यंत सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. त्यात नक्की युतीचं सरकार स्थापन होणार की आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार याबद्दल देखील राजकीय अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.

शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासह सर्व सत्तापदांचं समान वाटप करण्याची मागणी लावून धरली. शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्यानं भारतीय जनता पक्षाकडून इतर मार्गांचा वापर केला जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केला आहे. संजय राऊत म्हणजे शिवसेनेचे पोपट आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर अंकुश ठेवावा, असं देखील आमदार रवी राणा म्हणाले.

शिवसेनेचे २० ते २५ आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा दावा रवी राणा यांनी केला. ‘मागील 5 वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं. त्यांनी राज्याची जबाबदारी अतिशय व्यवस्थितपणे सांभाळली. त्यामुळे पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार रवी राणा यांनी पत्नी नवनीत कौर राणा यांच्यासह आज राज्यपालांची भेट घेतली.

बडनेराचे आमदार असलेल्या रवी राणा यांनी निकालानंतर लगेचच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाठिंब्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं. सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचे १०५ उमेदवार निवडून आले आहेत. याशिवाय काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ ११८ ते १२० च्या घरात पोहोचलं आहे.

विशेष म्हणजे एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. ते आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावयाचा काय? या मुद्याभोवती ही चर्चा फिरणार असल्याचे समजते. निकालानंतर ते देखील पहिल्यांदाच दिल्लीला आले आहेत. आज शरद पवार आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात दिल्लीत चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय पेचावर आता दिल्लीतच तोडगा निघण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना आता वेग आलाय. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाच्या बैठका, चर्चा आणि भेटीगाठीचा असणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत. निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री फडणवीस भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींना भेटणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेणार आहेत. सत्तास्थापनेमधल्या तिढ्यावर ते या भेटीत चर्चा करणार आहेत.

दरम्यान, खासदार राऊत हे आज राजभवनावर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे राऊत यांनी सांगितले. सरकार स्थापनेसाठी सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षास सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करावे, अशी विनंती राऊत राज्यपालांना करणार आहेत. यामुळे तर्कवितर्काना उधाण आले आहे.

हॅशटॅग्स

#Navneet Kaur Rana(19)#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x