12 December 2024 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

त्यामुळे शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द | काय आहे कारण?

North Maharashtra tour, Sharad Pawar, Eknath Khadse

मुंबई, १७ नोव्हेंबर: एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपाला धक्के देण्यास सुरुवात केली होती. काही दिवसातच त्यांनी भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणलं आणि भारतीय जनता पक्षाला खान्देशात राजकीय धक्के देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता शरद पवार देखील खान्देशात राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी सज्ज झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २० आणि २१ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम करुन राष्ट्रवादीत प्रेश केल्यानंतर शरद पवार प्रथमच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व असल्याचं समजलं जात होतं. शरद पवार उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार इथ शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जाणार होते.

मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्यात झाला आहे. नुकतंच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांनी खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. तर रोहिणी खडसे यांच्या संपर्कात आल्याने एकनाथ खडसे यांनीही स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा येत्या २० आणि २१ नोव्हेंबरला होणारा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

 

News English Summary: NCP President Sharad Pawar’s visit to North Maharashtra has been canceled. Eknath Khadse’s daughter Rohini Khadse, who recently joined the NCP, has contracted corona. He has since decided to be hospitalized as a precaution. Eknath Khadse has also quarantined himself after coming in contact with Rohini Khadse. Against this backdrop, Sharad Pawar’s tour of North Maharashtra on November 20 and 21 has been canceled.

News English Title: North Maharashtra tour of Sharad Pawar in cancel news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x