6 December 2024 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीचा मोठा निर्णय, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER EDLI Scheme | पगारदारांना सुखद धक्का; EDLI योजना 3 वर्षांनी वाढली, लाभ घेणे आणखीन झाले सोपे, वाचा सविस्तर - Marathi News HDFC Mutual Fund | 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनवेल 39 लाखांचा फंड; ही म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडेल Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत - NSE: SUZLON Electricity Bill | विज बिलावर सरकारकडून 100% सबसिडी; काय आहे विज बिलमाफी 2025 योजना, सविस्तर जाणून घ्या Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATASTEEL Horoscope Today | सूर्य-चंद्राचा व्यतिपात योग; आयुष्यात सुख-समृद्धी नांदेल तर, काहींचे प्रेमसंबंध बहरतील, यामध्ये तुमची रास आहे का पहा
x

मनसे नवी मुंबई-पालघर शाखांकडून जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक सांगली-कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Sangali Flood, Kolhapur Flood, MNS Tulsi Joshi, MNS Gajanan kale, MNS Palghar tulsi joshi

नवी मुंबई-पालघर : कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यात सांगलीतील बचावकार्यात तब्बल १६ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना देखील घडली. लाखो लोकांचे घरदार आणि संपूर्ण संसाराचं उध्वस्त झाले आहेत. दरम्यान, मदतीचा ओघ संपूर्ण राज्यातून सुरु झाला आहे तर दुसऱ्याबाजूला उशिरा का होईना, पण प्रशासनाकडून बचाव कार्य देखील युद्धपातळीवर सुरु असून, त्यात अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.

त्यात अनेक राजकीय पक्षांनी देखील जवाबदारीचे भान राखत शक्य तेवढी मदत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशापूर्वीच मनसेचे कोल्हापूर आणि सांगलीतील स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मदतकार्यात सामील झाला होते. तर दुसऱ्याबाजूला इतर शहरातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गरजेच्या सामानाची आणि निधीची जमवाजमव सुरु केली होती. त्याच्याच भाग म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवी मुंबई आणि पालघर शाखांकडून मोठ्या प्रमाणावर साहित्य सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने ट्रकमधून रवाना करण्यात आलं आहे.

अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळण्यास सुरुवात झाली. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. सर्व बाजूंनी मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्यास वेळ लागणार आहे. मनसेकडून साहित्यात अन्नधान्य, तयार अन्न, औषधे, कपडे, सॅनिटरी नॅपकिन इथंपासून ते अगदी पेस्ट, ब्रशपर्यंत अनेक जीवनोपयोगी वस्तू पुरवल्या जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या आजपासून पूरग्रस्त भागाचा दौरा सुरु झाला आहे. या दौऱ्यात त्या सर्वप्रथम सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ या गावाला भेट देणार आहेत. त्यानंतर त्या सांगली शहरातील पुरग्रस्तांशी भेटून समस्या जाणून घेणार आहेत. त्यानंतर मिरज शहरालाही भेट देणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीला भेट देऊन कराडकडे रवाना होणार असल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, आज शर्मिला ठाकरे यांनी पुरात मोठं नुकसान झालेल्या कराड येथील पाटण कॉलनीला भेट देऊन तिथल्या पुरग्रस्तांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. त्यावेळी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीच आम्हाला मदत केल्याचं गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं. सध्या सांगली तसेच कोल्हापुरातील अनेक भागात मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तळ ठोकून आहेत. मुंबई आणि संपूर्ण राज्यातील मनसेच्या शाखांमधून मागील आठवडाभर गरजेच्या वस्तूंचा पुरवठा सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने पाठवला जात असून, स्थानिक कार्यकर्ते त्या वस्तू पूरग्रस्तांना वाटत आहेत.

राज्यातील सत्ताधारी सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निरनिराळ्या यात्रा काढण्यात पुन्हा व्यस्त झाले असून, केवळ घोषणा करून आणि तुटपुंज्या मदत करून भरमसाट जाहीरबाजी करण्यात मग्न आहेत. मात्र त्या तुलनेत विरोधी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी सांगली आणि कोल्हापूरकरांच्या मदतीला धावले आहेत.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x