26 January 2022 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला Daily Rashi Bhavishya | 26 जानेवारी 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल 2022 Honda CBR650R | होंडा CBR650R 2022 भारतात लॉन्च | बुकिंग शुरू | वैशिष्ट्ये जाणून घ्या Gold Silver Prices Today | आज पुन्हा सोनं महागलं, पण चांदीचे दर घसरले | जाणून घ्या ताजी किंमत Top MidCap Fund | 5 स्टार रेटिंग असलेला आणि 50 टक्के रिटर्न देणारा हा टॉप मिडकॅप फंड लक्षात ठेवा
x

सुशांत प्रकरणी CBI चौकशीला मी विरोध करणार नाही, पवारांच्या विधानाने अनेकांना आश्चर्य

NCP President Sharad Pawar, CBI inquiry, Sushant Singh Rajput death case

मुंबई, १२ ऑगस्ट : माझा महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करायची असेल, तर मी विरोध करणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.

“मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांना ५० वर्ष ओळखतो. माझा पूर्ण विश्वास आहे. कुणी काय आरोप केले, याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली, तर निश्चितच दु:ख होतं, पण याची चर्चा ज्या पद्धतीने होते, मला त्याबद्दल आश्चर्य वाटतं” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेनेचा सीबीआय चौकशीला विरोध असल्याने आणि परस्पर त्याविरोधात पवारांनी भाष्य केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. विशेष करून विरोधकांनी नेमका तोच मुद्दा उचलून धरल्यास आश्चर्य वाटणार नाही. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी त्याबद्दल ट्विट देखील केलं आहे.

 

News English Summary: I have full faith in Maharashtra Police and Mumbai Police. However, if the CBI wants to probe the death of Sushant Singh Rajput, I will not oppose it, said NCP president Sharad Pawar.

News English Title: NCP President Sharad Pawar says wont oppose CBI inquiry in Sushant Singh Rajput death case News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x