30 November 2023 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 32 टक्क्यांपर्यंत परतावा Penny Stocks | पटापट हे टॉप 3 पेनी शेअर्स सेव्ह करा, 1 महिन्यात 147 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीत, शेअर्समधील तेजी कायम राहणार का? तपशील जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर शेअरने 5 दिवसांत दिला 22 टक्के परतावा, पैसा वेगात वाढतोय Gold Rate Today | अरे देवा! आजही सोन्याचे भाव मजबूत वाढले, लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचा दर किती महाग होणार? Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करतोय, 10 महिन्यांत दिला 150% परतावा, शेअरची किंमत उच्चांकी पातळीवर Aster DM Share Price | 1 दिवसात 20 टक्के परतावा देणाऱ्या एस्टर डीएम हेल्थकेअर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, नेमकं कारण काय?
x

Bhagwangad Dasara Melava | भागवत कराड भगवानगडावर आलेच नाही | शक्तिप्रदर्शनापूर्वी कोणी चक्र फिरवली?

Bhagwangad Dasara Melava

मुंबई, १५ ऑक्टोबर | पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध भाजपअंतर्गत राजकारण पुन्हा जोर पकडण्याची चिन्ह आहेत. विशेष आज पंकजा मुंडे भगवानगडावर शक्ती प्रदर्शन करणार असल्याने त्यांच्या सभेला केंद्रीय मंत्री सुद्धा उपस्थित होते असं (Bhagwangad Dasara Melava) राजकीय वजन वाढवणारं वातावरण होऊ द्यायचं नाही असा अखेरच्या क्षणी राज्यातील एक वरिष्ठ नेत्याने घेतल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे त्यासाठी औरंगाबादहून बीडच्या दिशेने निघालेल्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना संबंधित भाजप नेत्याचा कॉल गेला आणि सूत्र हलली असं भाजपच्या गोटातून वृत्त हाती आलं आहे.

Bhagwangad Dasara Melava. A big Dussehra gathering was held at Bhagwangada today under the leadership of Pankaja Munde. The gathering was attended by thousands of people. But even though Pankaja Munde stood up for the speech, Karad did not come to the end. This is surprising and many political implications of Karad’s absence are being made :

अनेक मराठी माध्यमांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्याचे थेट प्रक्षेपण केल्याने संबंधित नेत्याची पोटदुखी वाढली असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आज भगवानगडावर मोठा दसरा मेळावा झाला. या मेळाव्याला हजारो लोक उपस्थितहोते. या मेळाव्याला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड येणार असल्याचं सांगितलं जात होतं. कराड औरंगाबादहून बीडच्या दिशेने निघाल्याचंही सांगदितलं जात होतं. पण पंकजा मुंडे भाषणाला उभ्या राहिल्या तरी कराड अखेरपर्यंत आले नाही. त्यामुळे दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या कृपेने मोठे झालेले नेते पंकजा मुंडेंविरोधात त्यांच्याविरोधात फिरवण्याचे पक्षांतर्गत चक्र कोणी सुरु केलं याची चर्चा रंगली आहे.

सावरगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा पार पडला. लॉकडाऊननंतर दोन वर्षानंतर हा मेळावा पार पडत असल्याने या मेळाव्याला हजारो लोकं उपस्थित होते. या मेळाव्याला भागवत कराडही उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात होतं. ते औरंगाबादहून परळीला येणार असल्याचं सांगितलं जात होतं. वरून ते हेलिकॉप्टरनं पंकजांसोबत सावरगावच्या दसरा मेळाव्याला पोहोचणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. पण अखेरपर्यंत ते आलेच नाहीत. त्यामुळे उपस्थितांनी देखील शंका व्यक्त केली आहे.

या मेळाव्यात पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे भाषण झालं. खासदार प्रीतम मुंडे यांनी 15-२० मिनिटे भाषण केलं. पण या भाषणात त्यांनी एकाही वेळा कराड यांचा उल्लेख केला नाही. पंकजा मुंडे यांनीही भाषणात कराड यांचा उल्लेख केला नाही. शिवाय कराड यांचा स्टेजवरील पोस्टरमध्येही उल्लेख नव्हता. त्यामुळे कराड येणार नाहीत हे आधीच पंकजा यांना माहीत होतं का? अशी चर्चाही रंगली आहे.

मोदी सरकारने केलेल्या नव्या मंत्रिमंडळ विस्तरात मराठवाड्यातून डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. कराड यांना केंद्रात अर्थराज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा नाराज होत्या. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कराड यांना त्यांनी शुभेच्छाही दिली नव्हती. त्यानंतर वरळी येथील निवासस्थानी झालेल्या सभेत त्यांनी भाजप नेत्यांवर नाव न घेता टीकाही केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी कराड यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिली होती. या घटनेनंतर दोन ते तीन वेळा कराड आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्याने त्यांच्यात दिलजमाई झाल्याचंही बोललं जात होतं. परंतु, आयत्यावेळी कोणी चक्र फिरवली याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Bhagwangad Dasara Melava Union MoS Bhagwat Karad remain absent for program.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x