Success Mantra | तुमच्यात 'या' 5 सवयी आहेत? | त्याच ठरतात अनेकांच्या जीवनात अयशस्वी असण्याचं कारण

मुंबई, 11 ऑक्टोबर | वाईट सवयी आपल्यातील सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती नष्ट करतात. आपल्या यशस्वी होण्यामध्ये अडथळा आणतात आणि काही वेळा धोकादायकही ठरू शकतात. अशा सवयींनी आपले सर्व प्रयत्न निष्फळ होऊ शकतात आणि परिणामी आपला पाया कमकुवत करू शकतात. अशा सवयी आपल्याला सर्व तऱ्हेच्या कामगिरींमध्ये मागे खेचतात. या सवयींमुळे वर्तमान आणि भविष्यकाळ असे दोन्ही अंधारात जाऊ शकतात. चला तर, आज त्या
आपल्याला अपयशाकडे नेणाऱ्या सवयी (Success Mantra) नेमक्या कोणत्या त्याबद्दल बोलू;
Success Mantra. Bad habits destroy the positive energy and strength in us. They hinder your success and can sometimes be dangerous. Such habits can frustrate your efforts and weaken your foundation. Such habits push you back into all sorts of performances :
नकारात्मक विचार:
अनेक लोक काहीही करण्यापूर्वी त्याबद्दल नकारात्मक विचार करतात. ते नेहमी निराश असतात. ते स्वतःच्या आजूबाजूलाही निराशाजनक वातावरण निर्माण करतात. असे लोक जीवनात ‘काही नुकसान होईल की काय,’ या भीतीनं काहीच पाऊल उचलण्यास तयार होत नाहीत. यामुळं ते उलटसुलट विचार करत निष्क्रिय राहतात. असे लोक अनेकदा इतरांचाही उत्साहभंग करून त्यांनाही निराश करतात. अशा लोकांनी हा विचार करणं आवश्यक आहे की, जीवनात आव्हानं स्वीकारणं ही यशाची गुरुकिल्ली आहे. अशा परिस्थितीत सकारात्मक राहा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा.
इतिहास उगाळत राहणं किंवा इतिहासातच गुंग राहणं:
बऱ्याच वेळा आपण आपल्या आयुष्यात काही अपयशाच्या किंवा दुःखद घटनांशी स्वतःला घट्ट बांधून ठेवतो आणि प्रत्येक परिस्थितीत काहीही करण्यापूर्वी या घटना पुन्हा पुन्हा आठवत राहतो. पुढील प्रत्येक पायरी याच घटनांचा विचार करून ठरवण्याचा प्रयत्न करतो. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, इतिहासात राहण्याच्या या सवयीमधून बाहेर पडा. जर तुम्ही तुमचं जुनं अपयश उगाळत त्याच्याबद्दलच विचार करत राहिलात तर, तुमचा भविष्यकाळ उध्वस्त कराल.
अशक्य शब्दाचा वापर:
माणसासाठी तसं पाहिलं तर कोणतंही काम अशक्य नाही. मनात दृढनिश्चय असेल तर, सर्व काही शक्य आहे. अशा परिस्थितीत, ‘अशक्य’ शब्द तुमच्या आयुष्यातून काढून टाकला पाहिजे. एखादी गोष्ट आपण करू शकणार नाही, हे प्रयत्न करण्याच्या आधीच ठरवून टाकणं हे तुमच्या यशामध्ये अडथळा ठरतं.
नवी आव्हानं स्वीकारण्याला घाबरणे:
काही लोकांना अतिशय सुरक्षित जीवन जगायला आवडतं. त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नसतो. पण जर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही जोखीम घेतली नाही तर, तुम्ही आयुष्यात कधीही यशाची चव चाखू शकणार नाही.
फक्त इतरांमध्ये दोष शोधणं:
काही लोकांना सवय असते की, ते सर्व दोष इतरांवर टाकतात आणि इतरांना प्रत्येक गोष्टीत दोष देत राहतात. स्वतःच्या अपयशाचं खापर इतरांच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करतात. पण अशा सवयी असलेले लोक आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. इतरांच्या उणिवा पाहण्याऐवजी जे स्वतःच्या दोषांवर लक्ष केंद्रित करून ते दूर करण्याचा सतत प्रयत्न करत राहतात, ते यशस्वी होतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Success Mantra for positive energy to strengthen future success.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | झपाट्याने वाढलेला रेल्वे शेअर आता सातत्याने घसरतोय, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IRFC
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
-
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरला, पण HDFC सिक्युरिटीज ब्रोकरेज बुलिश – Nifty 50
-
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर्सवर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत – NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
-
TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका
-
MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL