Nagin Disease | कशामुळे होतो 'नागीण' आजार? | लक्षणे आणि घगूती उपाय | नक्की वाचा
Nagin Disease | नागीण हा रोग varicella zoster या नावाच्या वायरस मुळे होतो. याच वायरसमुळे कांजण्या पण होत असतात. हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि याला विसर्प या नावाने देखील ओळखले जाते. नागीण हा आजार कांजिण्याच्या विषाणूमुळे होतो. नागीण ही शरीराच्या एकाच बाजूला होते तसेच याची लागण २ अथवा ३ नसांना देखील होऊ शकते. नागीण शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकते.
समज-गैरसमज:
नागीण या आजाराविषयी गैरसमज अधिक आहेत. नागिणीने विळखा मारला की, जिवाला धोका असतो, हा त्यापैकी मोठा गैरसमज. गैरसमज दूर करून योग्य काळजी घेतल्यास नागिणीचा प्रसार कमी करण्यात मदत होईल. उन्हाळा सुरू झाला की, वाढत्या तापमानाबरोबर विविध साथीचे आजार पसरायला सुरुवात होते. विविध विषाणूजन्य या ऋतूत जास्त प्रमाणात जाणवतात. लहान मुलांमध्ये होणाऱ्या कांजिण्या आणि त्याच विषाणूंमुळे होणारी नागीण हे आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्या विषयीचे गैरसमज दूर करून योग्य ती काळजी घेतल्यास त्याचा प्रसार कमी करण्यास मदत होऊ शकते.
याची काही लक्षणे आहेत जसे की नागीण झालेल्या ठिकाणी वेदना होणं, लाल पुरळ येणे, तेथील त्वचेची आग होणे,तोंड येणे, ताप येणे, लघवीला त्रास होणे, ५/६ दिवसात खपल्या धरतात आणि फोड सुद्धा जातात. २/३ दिवसात लालसर पुरळांचे पुंजके येतात आणि त्यात पाणी धरते.
नागीण होण्याची कारणे:
1. रात्री सतत जागरण करणे:
नागीण (herpes zoster) होण्याच्या कारणांमध्ये हल्लीच्या लाईफ स्टाईलमुळे लागलेल्या चुकीच्या सवयी कारणीभूत आहेत. अपूर्ण झोपेमुळे तुमच्या शरीरावर अनेक परिणाम होऊ शकतात. नागीण होण्यामागे जरी कांजिण्यांचे विषाणू कारणीभूत असले तरी अपूर्ण झोप याला चालना देऊ शकते.
2. पित्तवर्धक आहार घेणे:
पित्तवर्धक आहार हा देखील तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. तुमच्या शरीरातील पित्त वाढल्यामुळेही तुम्हाला नागीणचा त्रास होऊ शकत. किंवा याला खतपाणी मिळू शकते. त्यामुळे पित्तवर्धक आहार घेणे टाळा.
3. अवेळी खाणे:
अवेळी खाण्याची सवय अनेकांना असते. खरंतरं अवेळी खाण्यामुळेच तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यापैकीच एक आहे ते म्हणजे नागीण. आता तुम्हाला वाटेल चुकीच्या वेळी काही खाल्ल्यामुळे तुम्हाला हा त्रास कसा होऊ शकतो तर याचे कारण आहे शरीरात वाढणारे पित्त. जर तुम्ही असे अवेळी खात असाल तर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो.
4. प्रतिकार शक्ती कमी होणे:
प्रतिकारशक्ती कमी झाली तरी तुम्हाला आजारांची लागण अगदी पटकन होते. नागीणच नाही तर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे तुम्हाला इतर आजारांची लागण ही होऊ शकते. जर कांजिण्याचे विषाणू तुमच्या शरीरातून पूर्णत: जायला हवे असतील तर तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे.
5. पित्त दुर्लक्षित करणे:
काही जणांना अॅसिडीची खूप त्रास असतो. काही जण रोजचा त्रास समजून याकडे दुर्लक्ष करतात. पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला नागीण सारखा गंभार आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला जर अॅसिडीटीचा त्रास असेल तर तुम्ही त्यावर योग्य इलाज करुन घ्या.
यावर उपचार लवकरात लवकर सुरु करणे गरजेचे असते. यासाठी डॉक्टर्स अँटी वायरल औषधे आणि वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे देतात. साधारणपणे दोन ते सहा आठवड्यात हा आजार बरा होतो. पण इतर घरगुती उपायही आहेत;
नागीण आजारावर घरगुती उपाय: Home remedies on Nagin disease in Marathi :
1. इसेन्शिअल ऑईल:
अनेक गोष्टींसाठी इसेंन्शिअल ऑईलचा उपयोग केला जातो. त्वचेच्या अनेक त्रासावर हे तेल रामबाण उपाय असते. तुम्हाला होणारी जळजळ कमी करण्यासाठी तेलाचा उपयोग होतो. पुरळ आलेल्या ठिकाणी इसेन्शिअल ऑईल लावा. तुम्हाला आराम मिळेल. शिवाय ही तेल नैसर्गिक घटकांपासून बनलेली असल्यामुळे तुम्हाला इतर कोणताही त्रास होत नाही.
2. थंड पाण्याचा वापर:
नागीणमुळे तुमच्या शरीराचा दाह होत असतो. तो दाह कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या करुन तुम्ही तुमच्या पुरळांवर ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. शिवाय तुमचे पुरळ सुकण्यासही मदत होते. त्यामुळे शक्य असेल तेव्हा नागीण झाल्यानंतर थंड गार पाण्यात पट्ट्या बुडवून तुमच्या पुरळ आलेल्या ठिकाणी ठेवा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
3. होमिओपॅथी गोळ्यांचा डोस:
नागीण आल्यानंतर अनेकदा ताप, तोंड फुटणे असे त्रास होतात. अशा त्रासांकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. अशावेळी तुम्ही होमिओपॅथ डॉक्टरांकडून काही गोळ्यासुद्धा घेऊ शकता. या गोळ्यांनीही तुम्हाला आराम मिळू शकतो.
4. ओटमिल मास्क:
त्वचेच्या अनेक समस्यांसाठी ओट्स लावण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला जर जळजळ थांबवायची असेल तर तुम्ही ओट्सचा मास्क तयार करुन पुळ्यांना लावू शकता तुम्हाला आराम मिळेल. जर तुम्ही मास्क काही काळासाठी लावून ठेवला तरी देखील तुम्हाला बरे वाटेल.
5. कॅमोमाईल आणि स्टार्च:
कॅमोमाईल तेल आणि स्टार्च यांचा उपयोगही तुम्ही तुमचा दाह कमी करण्यासाठी करु शकता. हल्ली कॅमोमाईल तेल सहज मिळते. त्यामुळे नागीणचा त्रास कमी करण्यासाठी याचा वापर तुम्हाला करता येईल. शिवाय तुमच्या पुळ्या लवकर सुकण्यासाठीही याचा उपयोग होतो.
6. थंड पाण्याची आंघोळ:
जर तुम्हाला नागीण झाली असेल तर या काळात तुम्ही थंड पाण्याची आंघोळ करणे टाळा कारण त्यामुळे तुम्हाला अधिक जळजळ होऊ शकते. या सगळ्या कालावधीत तुम्ही थंड पाण्याची आंघोळ करा. थंड पाण्यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळेल. शिवाय तुमच्या पुळ्यांची जळजळ थांबेल.
7. खाण्याचे योग्य नियोजन:
नागीण लवकरात लवकर बरी व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमचा आहारही योग्य ठेवण्याची गरज असते.अॅसिडीटी वाढेल असे पदार्थ तुम्ही खाऊ शकत नाही. तम्हाला तुमचा आहार अगदी सात्विक ठेवावा लागता. डाळ, भात, भाजी, पोळी, भाकरी असे पदार्थ तुम्ही या कालावधीथ खाऊ शकता. पण तुम्हाला तेलकट पदार्थ खाण्याची अजिबात परवानगी नसते. त्यामुळे तुम्ही जितके चांगले आणि हलके फुलके पदार्थ खा.
8. व्हिटॅमिन्स सप्लिमेंट:
कोणताही आजार झाल्यानंतर तुमच्या शरीराती व्हिटॅमिन्सचे प्रमाण कमी झालेले असते. शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळावे असे वाटत असेल तर तुम्ही व्हिटॅमिन्स सप्लिमेंट घेऊ शकता. पण डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही व्हिटॅमिन्स घेऊ नका. कारण त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो.
9. प्रतिकार शक्ती वाढवा:
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला चांगला आहार आणि चांगल्या दिनचर्येची गरज असते. जर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही चांगल्या आहाराचे सेवन करा. योग्यवेळी झोपा. आठ तासांची झोप पूर्ण करा. शरीराला आवश्यक असलेला व्यायाम करा. त्यामुळे तुम्हाला हलकेही वाटेल. त्यामुळे तुमची उर्जा टिकून राहील.
10. औषधांचे करा सेवन:
केमिस्टमध्ये तुम्हाला अशी काही औषध मिळतील ज्यामुळे तुम्हाला झालेल्या नागीणचा त्रास कमी होऊ शकतो. अनेक ठिकाणी acyclovir या गोळीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यासारखीच अनेक औषधं बाजारात मिळतात. पण तुम्ही डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन याचे सेवन करु शकता.
Health Title: Home remedies on Nagin disease check details 29 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News