11 August 2022 8:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | बाईकवर बसलेल्या चिमुकल्याला गाडीने चिरडण्याचा भीषण प्रयत्न, पण बापाने जे केलं ते चमत्कारिक, पहा व्हिडिओ Mutual Funds | दररोज फक्त 333 रुपये गुंतवून कमवा 6 लाख रुपयांचा भरघोस परतावा, हा म्युच्युअल फंड करेल करोडपती Viral Video | सुसंस्कृत चोर बघितला का?, देवीला हात जोडून नमस्कार केला, नंतर दानपेटी घेऊन फरार, व्हायरल व्हिडिओ पहा Viral Video | पायऱ्यांवर एकदा पडला, लगेच कपडे बदलून आला आणि पुन्हा काय झालं त्याचा व्हायरल व्हिडिओ पहा Horoscope Today | 12 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI PPF Account | SBI मध्ये PPF खाते उघडताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, आर्थिक नुकसान टाळून फायद्यात राहा Lucky Numbers | या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी 12 ऑगस्टचा दिवस वरदान, नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग
x

कोरोनाची लागण झालेला आमदार मतदानासाठी विधानसभेत प्रकटला आणि...

Corona Positive MLA Kunal Chaudhary, Rajya Sabha Voting, PPE Kit

भोपाळ, १९ जून : राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी आज अनेक राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. पण Coronavirus च्या पार्श्वभूमीवर चोख तयारी करूनच मतदान सुरू आहे. मध्य प्रदेशातले काँग्रेसच्या एका आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. Covid-19 पॉझिटिव्ह असतानाही ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले.

या आमदाराने विधानसभेत पाऊल टाकण्याआधी संसर्ग पसरू नये यासाठी कडेकोट जामानिमा केला होता. काँग्रेस आमदार मतदान करून निघून गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हा परिसर अशा प्रकारे सॅनिटाइझ करून टाकला. मध्य प्रदेशात राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान झालं.

कोरोनाच्या महामारीमुळे यापूर्वी 18 जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर कर्नाटकमधील 4 आणि मिझोरममधील व अरुणाचल प्रदेशच्या 1-1 जागेसह एकूण 19 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. राज्यसभेच्या 19 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 4, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3, झारखंडमध्ये 2 आणि मणीपूर, मिझोरम व मेघालय येथील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे.

सध्या मणिपूरमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण, सत्ताधआरी आघाडीतील 9 सदस्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, तेथील एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत रंगत आली आहे. येथून भाजपाने लीसेम्बा सानाजाओबा तर काँग्रेसने टी मंगी बाबू यांना उमेदवारी दिली आहे. कोरोनाच्या सावटाखाली पार पडत असलेल्या या निवडणुकीत कोरोनाचा फिवर पाहायला मिळाला.

 

News English Summary: A Congress MLA who had tested positive for COVID19, arrives at the state legislative assembly in Bhopal to cast his vote. Voting is currently underway for three Rajya Sabha seats of the state News latest Updates.

News English Title: Corona Positive MLA Kunal Chaudhary reached the legislature wearing PPE kit for voting News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x