2 May 2024 10:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

जनधन खाते आधार कार्डशी लिंक करा | मिळवा ५,००० रुपये - वाचा सविस्तर

Link your Jan Dhan bank account

मुंबई २१ जून | पंतप्रधान मोदींनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी केली होती. याद्वारे अल्पवयीन मुलेही आपल्या गार्डियनसह आपले खाते उघडू शकतात. या खात्याचे अनेक फायदे आहेत. सरकारी योजनांपासून मिळणारे लाभ थेट लाभार्थींच्या खात्या जातात. उदाहरणार्थ, कोरोनाच्या संकटादरम्यान सरकारने महिलांच्या बँक खात्यांमध्ये तीन महिन्यांपर्यंत पाचशे रुपये घातले होते. उज्ज्वला योजनेचे फायदेही थेट जनधन खात्यात पाठवले जातात. याचे इतरही अनेक फायदे आहेत. गरज पडल्यास यातून ५,००० रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते.

जनधन खात्यांमधून ५,००० रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट:
जर आपल्याला खूप गरज असेल तर आपण जनधन खात्यामधून ५,००० रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट करू शकता. भले आपल्या खात्यात पैसे असोत किंवा नसोत. मात्र हे लक्षात ठेवा की याचे स्वरूप कर्जासारखे असेल. ते बँकेला परत करावे लागेल. ओव्हरड्राफ्टचा अर्थ असतो की आपण आपल्या बँक खात्यात पैसे नसतानाही काही पैसे काढू शकता.

ओव्हरड्राफ्ट करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा:
ओव्हरड्राफ्ट करण्यासाठी आपल्याला काही अटीही आहेत. ओव्हरड्राफ्टसाठी आधी ६ महिने जनधन खातेधारकाला खात्यात पुरेशी रक्कम ठेवावी लागते. तसेच आपल्याला रूपे डेबिट कार्डवरून व्यवहारही करावे लागतील. जेव्हा बँकेला खात्री पटेल तेव्हा आपल्याला ओव्हरड्राफ्ट मिळेल. यावर व्याजदरही कमी असेल.

बँक खात्याशी आधारकार्ड लिंक करणे आवश्यक
जर आपण ५,००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट करू इच्छित असाल तर आपले बँक खाते आपल्या आधारकार्डाशी लिंक करा. हे आवश्यक आहे. याद्वारे आपण बँकेतून ५,००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट काढू शकता. यासोबतच आपल्याला अनेक लाभ मिळतील. रूपे डेबिट कार्डावर आपल्याला एक लाख रुपयांपर्यंतचा दुर्घटना विमा मिळतो. भले आपल्या खात्यात पैसे असोत किंवा नसोत. ३०,००० रुपयांचा अधिक विमाही मिळू शकतो. अशाप्रकारे खातेधारकाचा एखाद्या दुर्घटनेत मृत्यू झाल्यास तर १.३ लाख रुपये क्लेम केले जाऊ शकतात. जर आपले बँक खाते आधारकार्डाशी लिंक केलेले नसेल तर आपल्याला हा फायदा मिळणार नाही.

जनधन योजनेच्या खात्याचे आणखीही अनेक फायदे:
जनधन खात्याच्या या लाभांशिवाय इतरही अनेक फायदे आहेत. या खात्यातून आपण देशभरात कुठेही पैसे पाठवू शकता. सरकारी योजनांचे पैसे थेट आपल्या खात्यात जमा होतात. पेन्शन योजनाही सोप्याने मिळवता येतात. इतकेच नाही, तर आपण आपल्या खात्यात पैसे जमा केलेत तर बँकेच्या नियमांनुसार आपल्याला व्याजही मिळते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की पोहचावा.

News Title: Link your Jan Dhan bank account with Aadhar Card get rupees 5000 read to know more news updates.

हॅशटॅग्स

#JanDhan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x