27 July 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तरी गुलाबराव पाटील म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना आम्ही वाचवली... संतापाची लाट तीव्र होणार

Shivsena

Shivsena Party Symbol | केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी मोठा निर्णय घेत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं. त्याशिवाय शिवसेना हे नाव वापरण्यास ठाकरे गट आणि शिंदे गटाला अंतरीम मनाई केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून पुढील संघर्षास सज्ज असल्याचे सांगितले. दरम्यान, यावर शिंदे गटाकडून ज्या प्रतिक्रिया येतं आहेत त्यावर जनतेत तीव्र असंतोष वाढणार असा अंदाज व्यक्त होतं आहे.

बाळासाहेबांची शिवसेना संपायची असती तर आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो असतो. त्यामुळे कुणी काही म्हणत जरी असलं तरी बाळासाहेबांची शिवसेना आम्ही वाचवली असल्याचे म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसंच, निवडणूक आयोगाचा निर्णय हा तात्पुरत्या स्वरूपाचा असला तरी नवीन चिन्हासाठी मात्र दोन्हीही पक्ष तयारीला लागले असल्याचे मतंही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

दोन्हीही गटाची धनुष्यबाण चिन्हासाठी मागणी होती मात्र चिन्ह नाही मिळालं याचं आम्हाला दुःख असल्याचे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवास स्थानावरती बैठक बोलावली आहे. या बैठकीत नवीन चिन्ह निश्चित होण्याची शक्यता मंत्री गुलाबराव पाटील यांनी वर्तवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Party Symbol Shinde Camp leader Gulabrao Patil statement 09 October 2022.

हॅशटॅग्स

#Gulabrao Patil(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x