11 May 2021 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आमदार असते तर एका रात्रीत खरेदी केले असते | ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्सला विकत घ्यायला थोडा वेळ लागतो - आ. भाई जगताप पैसे दिल्याचं आरोपकर्ते परमबीर सिंग आणि सचिन वाझे सुद्धा म्हणत नाहीत, मग CBI, ED कारवाई कशाला? - काँग्रेस मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रपतींना पत्र | उद्धव ठाकरे ते पत्र आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार VIDEO उत्तर प्रदेश | मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेत जमले 20 हजार लोकं | प्रचंड गर्दीसमोर पोलिसही हतबदल भारतात पसरणाऱ्या स्ट्रेनला WHO ने नवीन व्हेरिएंट ऑफ कंसर्न घोषित केले | पण लस त्याविरोधात प्रभावी कोरोना आपत्ती | कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकलं | दैनंदिन रुग्णसंख्या व मृतांच्या यादीत गाठला उच्चांक Sarkari Naukri | बँक नोट प्रेसमध्ये 135 जागांसाठी भरती
x

नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊनचा काहीच फायदा नाही | कडक लॉकडाउनची गरज - डॉ. रणदीप गुलेरिया

AIIMS Dr Randeep Guleria

नवी दिल्ली, ०४ मे | एम्स’चे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशाला सावधानतेचा मोठा इशारा दिला आहे. भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार आहे. नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊनचा काहीच फायदा नाही, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

‘इंडिया टुडे’ने डॉ. रणदीप गुलेरिया यांची मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी हा इशारा दिला आहे. कोरोना महामारी अशीच वाढत राहिली आणि इम्यून एस्केप मॅकेनिझ्म विकसित करण्यात यशस्वी झाल्यास भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पर्याप्त कालावधीसाठी लॉकडाऊन करण्याची गरज आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एम्स’चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी मुलाखत देताना सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी देशातील परिस्थिती, त्यामागील कारणं, नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन आणि कडक लॉकडाउन लागू करण्याबाबत भूमिका मांडली. डॉ. गुलेरिया म्हणाले,”आता तीन गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. पहिली म्हणजे रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं. दुसरी, आक्रमक कार्यपद्धती स्वीकारून रुग्णसंख्या कमी करणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात लसीचं उत्पादन. आपल्याला विषाणू संसर्गाची साखळी तोडावी लागणार आहे. जर आपण माणसामाणसांतील संपर्क टाळू शकलो, तर रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता आहे,” असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: The director of AIIMS, Dr. Randeep Guleria has given a big warning to the country. India will have to face the third wave of corona. Night curfew, weekend lockdown is of no use, says Dr. Randeep Guleria has said.

News English Title: India need only strict lockdown to control corona spread said director of AIIMS Dr Randeep Guleria during interview news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1352)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x