24 April 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा सर्वात स्वस्त शेअर तेजीत, 2 दिवसात दिला 14% परतावा, यापूर्वी 2926% परतावा दिला Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ
x

BREAKING | केंद्र सरकार ऑक्सिजन पुरविण्याबाबतचं आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरलंय - दिल्ली हायकोर्ट

Oxygen shortage

नवी दिल्ली, ०४ मे | देशभरात कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स, कोरोना लसीची कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजन कमतरतेमुळे अनेकांचे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयासह देशातील अनेक हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. दिल्ली हायकोर्टात झालेल्या सुनावणीवेळी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असून, तुम्ही डोळेझाक करू शकता, आम्ही नाही, असे म्हटले आहे.

यावेळी केंद्र सरकार ऑक्सिजन पुरविण्याबाबतचं आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरलंय असं हायकोर्टाने स्पष्ट म्हटल्याने मोदी सरकारची मोठी राजकीय कोंडी झाली आहे. दिल्लीसह अनेक ठिकाणच्या रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजनच्या कमतरेतमुळे झाल्याचे अॅमिकस क्युरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर, महाराष्ट्रात आताच्या घडीला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा असून, तेथील काही ऑक्सिजन टँकर दिल्लीत पाठवले जाऊ शकतात, असा सल्ला न्यायालयाने दिला.

दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारत, सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीला ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन द्यावा, असे निर्देश दिले असल्यास दिल्लीला त्याप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला पाहिजे, असे स्पष्ट केले. तसेच न्यायालय मित्राने यावेळी ऑक्सिजनच्या स्टोअर केला जाऊ शकतो, यावर विचार व्हावा, असे न्यायालयाला सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील केंद्र सरकारवर टीका:
केंद्र सरकारवर देशात विरोधकांकडून आणि काही तज्ज्ञांकडून टीका केली जात असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. अमेरिकेतील आघाडीचे वर्तमानपत्र असलेल्या न्यू यॉर्क टाईम्सने म्हटल्यानुसार, “आरोग्य तज्ज्ञांनी या परिस्थितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अती आत्मविश्वास कारणीभूत ठरल्याचं म्हटलं आहे. मोदींचा अतीआत्मविश्वास आणि त्यांच्या नेतृत्वाची डॉमिनेटिंग शैली ही सर्वाधिक जबाबदार आहे. करोनाचं संकट असून देखील मोदींच्या प्रशासनाचा प्रयत्न हाच होता की भारताची पुन्हा सुस्थितीत आणि सारंकाही सुरळीत झालं आहे, अशी प्रतिमा तयार केली जावी.”

महाराष्ट्रात देखील ऑक्सिजनची मागणी वाढली:
दुसरीकडे महाराष्ट्रातल्या एकूण १६ जिल्ह्यांमध्ये सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून त्यामुळे ऑक्सिजनची मागणी देखील वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्देशांनुसार राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. त्यानुसार राज्यात ऑक्सिजन मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात २०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा. त्यासोबतच, लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० आयएसओ टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत”, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

 

News English Summary: The Modi government is in a dilemma as the High Court has made it clear that the Center has failed to deliver on its promise to provide oxygen. Amicus Curiae pointed out to the court that the deaths of patients in many places, including Delhi, were due to lack of oxygen.

News English Title: Centre government has failed to meet its assurance on Oxygen Supply to Delhi Govt said Delhi High Court news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x