डिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री
नवी दिल्ली, १७ मे : आज लॉकडाऊन ३ चा शेवटचा दिवस आहे, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजसंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सविस्तर माहिती देत आहेत, त्यासाठी आज शेवटची पत्रकार परिषद झाली. याआधी ४ टप्प्यांमध्ये विविध क्षेत्रांसाठी अर्थमंत्र्यांकडून दिलासादायक घोषणा करण्यात आल्या आहेत. रविवारी ही पत्रकार परिषद सकाळी ११ वाजता सुरू झाली. आजच्या पाचव्या पत्रकार परिषदेमध्ये गुंतवणूक सेक्टर, ट्रेडिंग या क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता होती. ‘आत्मनिर्भर भारत बनवण्याची गरज आहे’, असं वक्तव्य यावेळी अर्थमंत्र्यानी केले.
Online education during COVID19: Swayam Prabha DTH channels launched to support and reach those who do not have access to the internet; now 12 channels to be added: FM Nirmala Sitharaman pic.twitter.com/ddxHs3fuCk
— ANI (@ANI) May 17, 2020
दरम्यान देशावर आलेलं कोरोनाचं हे एक संकट आणि आव्हान म्हणजे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी संधी आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं. रविवारी (१७ मे) सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली असून यामध्ये पंतप्रधान मोदींनी घोषित केलेल्या पॅकेजचा अखेरचा टप्पा घोषित करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील उपाय योजनाबद्दल यामध्ये महिती देण्यात आली असून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. मल्टीमोड अॅक्सेस डिजिटल/ऑनलाईनच्या माध्यमातून पंतप्रधान ई विद्या योजनेची सुरुवात केली जाणार आहे. तसेच या अंतर्गत अनेक कोर्स, शैक्षणिक चॅनल, कम्युनिटी रेडिओ, ई कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत.
चॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मितीही होईल. वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे १२ वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील. पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल. देशातील टॉप १०० विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.
News English Summary: It provides information on education measures and important announcements. The Prime Minister’s e-Vidya Yojana will be launched through Multimode Access Digital / Online. Also, many courses, educational channels, community radio, e-courses will be started under this.
News English Title: Swayam Prabha Dth Channels Launched To Support And Reach Those Who Do Not Have Access To The Internet News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा