5 June 2023 11:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | तो फ्लॅटफॉर्मवर तरुणीच्या मागे सावकाश चालत होता, मेट्रो ट्रेन जवळ येताच तिला उचलून रुळावर उडी मारली आणि.... Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 06 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार? Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल Numerology Horoscope | 06 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८५,९७५ वर; मुंबईत एका दिवसात १,४२१ नवे रुग्ण

Covid 19, Corona Virus

मुंबई, ८ जून: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय. काल राज्यात ३ हजार ७ नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८५ हजार ९७५ वर पोहचला आहे. तर एका दिवसात ९१ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनाबळींची संख्या ३ हजार ६० इतकी झाली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. काल एका दिवसात १ हजार ४२१ नव्या रुग्णांची भर पडल्याने मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ४८ हजार ५४९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात झालेल्या ६१ मृत्यूंसह मुंबईतील कोरोनाबळींची संख्या १ हजार ६३६ वर पोहोचली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील बाधितांचा आकडा झपाट्याने वाढतोय. पुण्यात काल दिवसभरात २२१ नव्या रुग्णांची भर पडल्याने येथील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९ हजार ५२३ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ६ रुग्णांच्या मृत्यूमुळे कोरोनाबळींची संख्या ४०९ इतकी झाली आहे.

राज्यात रविवारी ३००७ करोनाग्रस्तांची नोंद झाली असून करोनाग्रस्तांच्या एकूण संख्येनं ८५ हजारांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, करोनामुळे राज्यातील मृतांची संख्याही आता ३०६० झाली आहे. तर राज्यात सध्या ४३ हजार ५९१ ऍक्टिव्ह केसेस असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

 

News English Summary: The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 85975. Today,newly 3007 patients have been identified as positive. Also newly1924 patients have been cured today,totally 39314 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 43591.

News English Title: Than 3 Thousand Covid 19 Patients Found Today Numbers Crossed 85 Thousand Mark 91 Death Today News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x