कल्याण : आगामी लोकसभा निवडणुका अगदी ३-४ महिन्यांवर येऊन ठेपल्याने भाजपने निवडणुकीचे उदघाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केले आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते कल्याण तसेच पुण्यात मेट्रो ट्रेनचे भूमिपूजन पार पडणार आहेत. विशेष म्हणजे हा कार्यक्रमाला भाजपचा मित्र पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही.
त्यामुळे या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेनेचे नेते गैरहजेरी लावणार आहेत. नरेंद्र मोदी सकाळी दिल्लीहून विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. इथून ते हेलिकॉप्टरने राजभवनात दाखल झाले आहेत. यावेळी ते प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्यावरील एका पुस्तकाचे प्रकाशन करतील आणि त्यानंतर थेट ट्रायडेंट हॉटेलमध्ये एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवतील. त्यानंतर दुपारी नरेंद्र मोदी पुन्हा हेलिकॉप्टरने कल्याणच्या दिशेने रवाना होतील. आणि संध्याकाळी ते पुण्याला रवाना होतील असे वृत्त आहे.
