29 March 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर
x

घाटकोपरमधील कट्टर शिवसैनिक बोलतात, 'आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला'

Raj Thackeray, MNS, Shivsena, Oppose Ram Kadam, Ghatkopar West, BJP, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने रविवारी ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने ९० टक्के उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत.

दरम्यान ब्राह्मण समाजाचा तीव्र विरोध असताना देखील चंद्रकांत पाटलांना कोथरूड येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महिलांबाबत अत्यंत संतापजनक वक्तव्य करणारे घाटकोपरचे आमदार राम कदम याना पुन्हा तिकीट दिल्याने समाज माध्यमांवर संताप व्यक्त करण्यात येतो आहे. मात्र आता राम कदम यांच्या उमेदवारीवरून सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील रोष व्यक्त केला आहे.

शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर घाटकोपर पश्चिममधून भाजपचे विद्यमान आमदार राम कदम यांनाच उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांच्या नावाला शिवसेनेतून तीव्र विरोध होत आहे. विशेषत: स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नावावर तीव्र नाराजी असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राम कदम यांना मतच देणार नसून मनसेला मत देणार असल्याचं इथल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी जाहीर केलं आहे. तसे बॅनरच घाटकोपरमध्ये लावण्यात आले असून या बॅनरवर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना कार्यकर्त्यांनी खुलं पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये ‘आमचं मत यावेळी राज ठाकरेंच्या मनसेला’ असं नमूद करण्यात आलं आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x