14 November 2019 1:16 PM
अँप डाउनलोड

अंधेरी पूर्व: सेनेचे आ. रमेश लटकेंच्या विरोधात भाजपचे मुरजी पटेल अपक्ष उमेदवार; सेनेचा मार्ग खडतर

BJP Mumbai, Maharashtra Vidhansabha Election 2019, Shivsena BJP alliance

मुंबई: अंधेरी पूर्व मतदारसंघातून सेनेला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. युती जाहीर झाल्याने ही जागा सेनेच्या वाट्याला आल्याने भाजपचे मुरजी पटेल यांनी बंड पुकारलं असून ते आज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल हे दोघे याच विधानसभा क्षेत्रातील भाजपचे स्थानिक नगरसेवक होते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचं पद न्यायालयाने खोट्या जातीच्या दाखल्यामुळे रद्द केलं होतं.

शिवसेनेचे रमेश लटके याच मतदासंघातील विद्यमान आमदार असल्याने आणि युती झाल्याने ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे. याच मतदारसंघात मुरजी पटेल यांच्या जीवनज्योत प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचं मोठं समाज कार्य असल्याने त्यांचा या मतदारसंघावर चांगलं प्राबल्य आहे . विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेत असल्याने तत्कालीन नगरसेवक असलेले सेनेचे रमेश लटके यांचा विजय सोपा झाला होता. मात्र त्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि ते आणि त्यांच्या पत्नी महापालिका निवडणुकीत मोठ्या मताने जिंकले होते.

मागील ५ वर्षात मुरजी पटेल यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली होती, मात्र युती झाल्याने गणित बदललं आहे. त्यामुळे ते आता अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. याच मतदारसंघात एकाधिकारशाही गाजवणाऱ्या आमदार रमेश लटके यांच्याविरोधात स्थानिक सेने पदाधिकाऱ्यांचा देखील रोष असल्याचे समजते. त्यात मुरजी पटेल हे जुने काँग्रेसवासी असल्याने त्यांना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा देखील छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे रमेश लटके यांचा मार्ग खडतर असल्याचं स्थानिक पातळीवर चित्र आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(729)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या