4 July 2020 1:55 AM
अँप डाउनलोड

भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांचा अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रात सामाजिक कामाचा धडाका

मुंबई : सध्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत आणि त्या निमित्ताने सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. त्या अनुषंगाने अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रात भाजपचे विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल यांनी सामाजिक आणि विकास कामांचा जोरदार धडाका लावला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

स्थानिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन विकास कामांवर भर देण्याचा भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांचा भर आहे. त्यासाठी वार्ड क्रंं.81 आणि वार्ड क्रंं.१२१ मध्ये विकासकामांचा धडाका लावला आहे. स्थानिक गरीब महिलांच्या आणि वरिष्ठ नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन या वॉर्ड मध्ये नव्या सुलभ सौचालयांची उभारणी आणि अनेक ठिकाणी एलईडी लाईट्स बसविण्यात आल्या आहेत. तसेच वार्ड क्रं.८१ मूळगाव डोंगरी कनकीय (एस.आर.ए) बिंल्डिंग येथे रहिवाशांना कायमस्वरूपी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या पिण्याच्या पाण्याचे लाईन टाकून देण्यात अली आहे.

जीवन ज्योत प्रतिष्ठान या मुरजी पटेल यांच्या सामाजिक संस्थेमार्फत स्थानिक गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च सुद्धा भागवला जातो. त्यासाठी त्यांना मोफत वह्या-पुस्तक वाटप करण्यात येत आणि दारिद्र्य रेषेखाली मुलांच्या फी संबंधित खर्च सुद्धा उचलला जातो. मुरजी पटेल यांच्या पत्नी केशरबेन मुरजी पटेल या सुद्धा भाजप नगरसेविका आहेत. मुरजी पटेल यांच्या विकास कामांचा आणि सामाजिक बांधिलकीचा विचार केल्यास, त्यांच्याकडे आगामी निवडणुकीत भाजपचे आमदार पदाचे तगडे उमेदवार म्हणून पाहिलं जात. मागील विधानसभा निवडणुकीवेळी ते शिवसेनेत असल्यामुळे शिवसेना उमेदवाराचा विजय सोपा झाला होता. परंतु सध्या ते भाजपमध्ये असल्याने भाजपच पारडं येत्या निवडणुकीत जड असल्याचं राजकीय विश्लेषक बोलत आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

BJP(416)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x