कोल्हापूरमधून निवडून येणार होतात | मग मेधा कुलकर्णींचं तिकीट का कापलं
नाशिक, ३ ऑक्टोबर : राज्यातील २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधून निवडून येणार होतात असं म्हणता मग पुण्यात कोथरूड मधून मेधा कुलकर्णी (BJP Former MLA Medha Kulkarni) यांचा अधिकार भारतीय जनता पक्षाने का डावलला? असा प्रतिप्रश्न करत अन्न आणि औषध मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांना सणसणीत टोला लगावला आहे. कालच त्यांनी राष्ट्रवादीला आव्हानाची भाषा करताना कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं राजकीय चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना राजकीय चिमटे काढण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचे उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरु डॉ. मोहन खामगावकर उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
“(राज्यपाल) महोदय यांच्या उपस्थितीत आगामी दोन वर्षांत सर्व इमारती बांधा” अशी राजकीय कोपरखळी देखील छगन भुजबळांनी लगावली. त्याला लागलीच राज्यपालांनीही प्रतिउत्तर दिलं. तब तक क्या सीन रहेगा? या कोश्यारींच्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले “हम तब भी आपके साथ ही रहेंगे” या दोघांच्या जुगलबंदीनं व्यासपीठावर उपस्थितांसमोर एकच हशा पिकला.
News English Summary: Saying that they will be elected from Kolhapur in the 2019 assembly elections in the state, then why did the Bharatiya Janata Party deprive Medha Kulkarni of her rights from Kothrud in Pune? Responding to this, Food and Drug Minister Chhagan Bhujbal has lashed out at BJP state president Chandrakant Patil. Yesterday, while challenging the NCP, he had given a political challenge that he would not go to the Himalayas but would be elected from Kolhapur. Since then, NCP leaders have started pinching him politically.
News English Title: Minister Chhagan Bhujbal taunts BJP State President Chandrakant Patil asks why Medha Kulkarni denied ticket from Pune News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा