कोरोनाची लागण झालेल्या २७ सहकलाकारांना त्याने इस्पितळात सोडलं | तिच्यासाठी तो नराधम
मुंबई, ३ ऑक्टोबर : सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिका (Aai Mazi kalubai) सध्या लोकांच्या आवडीची झाली आहे. अलका कुबल (Senior Actress and Producer Alaka Kubal) यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत तरुण अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Actress Prajakta Gaikawad) देखील प्रसिद्धीच्या पहिल्या टप्प्यातच वादात आल्याने भविष्यात तिच्या एकूण प्रोफेशनवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी घटना घडली आहे.
कारण ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला काढून टाकण्यात आल्याचं धक्कादायक वृत्त आहे. निर्मात्यांनी वेळ घेत निर्णय घेतला असला तरी त्यांचा व्यावसायिक संयम सुटल्याने त्यांना असा निर्णय घेणं भाग पडलं आहे. तिच्या जागी आता मराठी बिग बॉसमध्ये घरा घरात पोहोचलेल्या वीणा जगताप हिची वर्णी लागली आहे.
दरम्यान, प्राजक्ताला तडकाफडकी मालिकेतून का काढावं लागलं याची संपूर्ण माहिती निर्मात्या अलका कुबल यांनी राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे प्राजक्ताला काढून टाकण्या इतपत नव्हे तर तिच्यावर अनेक आरोप देखील निर्मात्या अलका कुबल यांनी मुलाखतीत केलं आहेत. अलक कुबल यांच्या आरोपांमुळे भविष्यत इतर निर्माते देखील त्यांच्या मालिकांपासून प्राजक्त गायकवाडला दूर ठेवणं पसंत करतील अशी शक्यता आहे.
सदर मुलाखतीत आरोप करताना अलका कुबल यांनी सेटवरील सम्पुर्ण कथनच केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांच्या आरोपानुसार, सेटवर आल्यावर प्राजक्ताचे सतत नखरे इतर कलाकारांना सहन करावे लागायचे. शूटिंगच्या वेळेत मध्येच तिचं डोकं दुखतं असल्याचं म्हणायची, तर कधी मध्येच सम्पुर्ण शूटिंग थांबवायला सांगायची, तर मध्येच रडत बसायची असे प्रकार वारंवार घडायचे. अनुभवी कलाकार शरद पोंक्षे आणि मालिकेतील इतर वरिष्ठ कलाकारांनी मला अनेकदा प्राजक्ताला मालकीतून काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. पण तरी मी तिला समजून घेण्याचाच प्रयत्न केला होता”, असं त्यांनी सांगितलं.
प्राजक्ता कधी कधी तब्बल ६ तास रुममधून बाहेर नसे. “सगळे कलाकार बराच वेळ तिची सेटवर वाट पाहत बसायचे. आशालता यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार देखील तिच्यासाठी थांबायच्या हे दुर्दैव म्हणावं लागेल. मात्र तिला कसलीच लाज नाही आणि चेहऱ्यावर लवलेशही दिसायचा नाही. उलट सेटवर सगळ्यांना दम देणे, वारंवार नखरे करणे हे तिचं नित्याने सुरूच असायचं. तिच्यामुळे नाइलाजाने आम्हाला रात्री शूट करण्याची वेळ यायची. पण या कलाकारांमध्ये एवढी हिंमत कुठून येते, कोणाच्या जिवावर माज करतात”, अशा शब्दांत अलका कुबल मुलाखतीत संतापल्याच पाहायला मिळालं.
विशेष म्हणजे प्राजक्ताला समज देऊन दुसऱ्यांदा संधी देण्यात आली होती. परंतु त्यानंतर सुद्धा तिच्या एकूण वागणुकीत कोणताही फरक दिसला नाही आणि अखेर तिला मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं अलका यांनी स्पष्ट केलं.दरम्यान, प्राजक्ताचं हेकेखोर वागणं तिच्या अंगाशी आल्याची प्रतिक्रिया अनेकजण समाज माध्यमांवर व्यक्त करत आहेत.
आता या सर्व आरोपांवर प्राजक्ताने प्रसार माध्यमांकडे बाजू मांडली आहे. “मला मालिकेतून काढून टाकलं नाही तर मी स्वत: मालिका सोडली आहे”, असं तिने स्पष्ट केलं आहे. तसेच मी सेटवर उशिरा येण्याचा प्रश्नच नव्हता कारण जिथे शूटिंगच्या ठिकाणीच आम्ही राहत होतो तसेच मेकअप आणि हेअरस्टाइलसाठी वेगळी रुम नव्हती तर ओपन स्पेसमध्ये मेकअप करत होतो असं तिने स्पष्ट केलं आहे.
तसेच मी प्रोजेक्ट हाती घेतानाच मला इंजिनीअरिंगची परीक्षा द्यायची आहे हे स्पष्ट केलं होतं. पण कोरोनामुळे मे-जूनमध्ये होणार परीक्षा, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेतल्या गेल्या आणि त्यामुळे शूटिंग पुन्हा सुरुवात झाली तेव्हाच माझ्या परीक्षा आल्या. त्यामुळे मला माझ्या वाहिनीकडून मालिकेचं नुकसान होऊ नये म्हणून मी परीक्षा देखील दिली नाही असं तिने म्हटलं आहे.
त्यात मालिकेच्या सेटवरील तब्बल सत्तावीस जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर गावकऱ्यांनी देखील टीमला अडवलं होतं आणि शूटिंग थांबवली गेली. अखेर मुंबईला शूटिंग करायचं ठरवलं. मी पुण्यातून साताऱ्याला गेले, तेव्हा तुझ्यासोबत विवेक सांगळे (Actor Vivek Sangale) सुद्धा येणार आहे, असं मला अधिकृतपणे सांगण्यात आलं. विशेष म्हणजे आम्ही एकाच गाडीने प्रवास करणार होतो. मात्र तो २ तास उशिरा आला. त्याचं उशिरा येण्याचं कारण विचारलं असता तो म्हणाला सेटवर जे करोना पॉझिटिव्ह आढळले, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे साहजिकच काळजी म्हणून त्या व्यक्तीसोबत मी सातारा ते मुंबई इतका प्रवास कसा करणार?
पण मी प्रश्न विचारातच त्याने मला वाईट पद्धतीने शिव्या दिल्या. तुला अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं असेल पण मी नाही घेणार, म्हणत त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदर घटना मी अलकाताईंच्या कानावर २-३ वेळा घातली. त्यांनी फक्त मी बघते असं उत्तर दिलं. त्यांच्याकडून या घटनेची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्या स्वत: देखील एक स्त्री आहे, त्यांना २ मुली आहेत. त्यांच्या मुलींच्या बाबतीत अशी घटना घडली असती तर मला खात्री आहे की त्या गप्प बसल्या नसत्या. विवेक सांगळे ही व्यक्ती समोर आली तरी मला शिवीगाळची घटना आठवते. त्याच्यामुळे खरंतर मी मालिका सोडली.” तसेच तुम्हाला सीरिअल पुढे चालवायची आहे म्हणून तुम्ही अशा नराधमांना पाठिशी घालता, हे चुकीचं आहे,” असं ती म्हणाली.
News English Summary: Prajakta Gaikawad has sided with the media on the allegations. “If I was not removed from the series, I would have left the series myself,” she explained. She also clarified that I was not late for the set as we were staying at the place of shooting and there was no separate room for makeup and hairstyle but we were doing makeup in open space.
News English Title: Aai Majhi Kalubai actress Prajakta Gaikwad reply to Alka Kubal Allegation news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट