12 April 2021 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

VIDEO | तुझ्यात जीव रंगला मालिका | नंदिता वहिनीची भूमिका या सुंदर अभिनेत्रीकडे

Tuzhat Jeev Rangala, Madhuri Pawar, Nandita Role, Pathak Bai

मुंबई, ३१ ऑक्टोबर: मालिका विश्वात राणा आणि अंजलीची जोडी चांगलीच चर्चेत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत इतर पात्रांप्रमाणे ‘नंदिता वहिनीं’ची (Nandita Vahini) खलनायकी भूमिकाही तितकीच लक्षवेधी ठरली होती. मालिकेतील ‘वहिनी साहेबां’चे पात्र संवाद आणि तिच्या हटके स्टाईलमुळे लोकप्रिय झाले होते. मध्यंतरीच्या काळात कथानकाप्रमाणे या वहिनी साहेबांची तुरुंगात रवानगी झाली होती. ‘नंदिता’ साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगांवकरने मालिकेला ‘रामराम’ म्हटल्याने कथेत ट्विस्ट आला होता. फसवेगिरी आणि कटकारस्थानासाठी शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब आता पुन्हा मालिकेत एंट्री करत आहेत. अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) आता ही भूमिका साकारणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आता अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार ही ‘नंदिता वहिनी’ म्हणजेच वहिनीसाहेबांची भूमिका साकारताना दिसणार आहे. माधुरी ही एक उत्तम नृत्यांगना असून तिने ‘अप्सरा आली’ या नृत्यावर आधारित कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र, आता ती आता नंदिता वहिनींच्या भूमिकेत काय कमाल करणार आहे याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. (Actress Madhuri Pawar will play nandita vahini in tuzyat jeev rangala)

कदाचित अनेकांनी हे नाव ओळखलेही असेल, झी युवा वाहिनीवरील अप्सरा आली या शो ची विजेती म्हणून माधुरीने आपले नाव गाजवले आहे. नृत्याची विशेष आवड असलेल्या माधुरीच्या टिकटॉकवरील नृत्याच्या अदाकारीने अनेक चाहत्यांना घायाळ केले होते. तिची हीच अदाकारी अनेक लावणी नृत्यामधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. मूळची सातारा जिल्ह्याची असलेली माधुरी आपल्या आई वडिलांच्या प्रेत्साहनाने नृत्यात निपुण झाली. वडील जोतिराम पवार गवंडी काम करत. त्यामुळे ज्या गावी काम त्या गावी त्यांचा मुक्काम असायचा. तिथेच त्यांनी आपल्या मुलीला माधुरीला नृत्याचे धडे दिले पुढे यातूनच राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा तीने गाजवल्या. नृत्यासोबतच अभिनयाचे धडेही तिने गिरवले. अजय गोगावले यांनी गायलेल्या “पावसाळी या ढगांनी” म्युजिक व्हिडीओ मध्ये माधुरी झळकली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून माधुरी छोट्या पडद्यावर झळकत आहे.

 

News English Summary: Now actress, dancer Madhuri Pawar will be seen playing the role of ‘Nandita Vahini’ i.e. Vahinisaheb. Madhuri is a great dancer who won the first number in the dance based program ‘Apsara Aali’. However, now the audience is paying attention to what she is going to do in the role of Nandita Vahini.

News English Title: Marathi TV Serial Tuzhat Jeev Rangala Madhuri Pawar in role of Nandita entertainment News Updates.

हॅशटॅग्स

#Marathi TV Serial(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x