26 April 2024 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सुशांत आत्महत्या : बिहार पोलीस तपास अधिकारी मुंबई पालिकेकडून होम क्वारंटाईन

Patna IPS Officer, Sushant Singh Rajput Case, Forcibly Quarantined, Bihar DGP

मुंबई, ३ जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या पटणाचे एसपी विनय तिवारी यांना १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन करण्यात आलंय. त्यामुळे तिवारी यांना मुंबईतली पहीली रात्र गोरेगावच्या एसआरपीएफ कॅम्प घालवावी लागली. तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर बिहार पोलिसांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आमचा तपास रोखण्यासाठी एसपी विनय तिवारींना होम क्वारंटाईन नव्हे तर हाऊस अरेस्ट केल्याचे बिहार पोलिसांचे म्हणणे आहे. बिहार पोलिसांचा तपास रोखण्यासाठी हे जाणिवपूर्वक पाऊल उचलल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

“बिहार पोलीस पथकाचे नेतृत्व करण्यासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी रविवारी मुंबईत दाखल झाले. पण रात्री ११ वाजता मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीने क्वारंटाइन केलं” असं बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी टि्वट केले आहे. “विनंती करुनही त्यांना आयपीएस मेसमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली नाही. ते गोरेगावच्या एका गेस्टहाऊसमध्ये राहत आहेत” असे टि्वटमध्ये म्हटले आहे.

बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून हवं तसं सहकार्य मिळत नसल्याची टीका अनेकांनी केली होती. तसेच मुंबई पोलीस मदत करत नसल्याचं म्हटलं जात आहे. बिहारच्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी हे वृत्त फेटाळून लावलं होतं. मुंबई पोलिसांनी आपल्या टीमसोबत कोणतही गैरवर्तन केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. “मुंबई पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केलं नसल्याच मुंबईतील टीमने आम्हाला कळवलं आहे. मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांच्या टीमशी गैरवर्तन करण्याच्या सर्व रिपोर्टचा मी निषेध करतो” असं बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर आता मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMCने जबरदस्तीने क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केला आहे.

 

News English Summary: Patna SP Vinay Tiwari, who came to Mumbai to probe actor Sushant Singh Rajput’s suicide, has been quarantined till August 15. So Tiwari had to spend the first night in Mumbai at the SRPF camp in Goregaon.

News English Title: Patna IPS Officer Probing Sushant Singh Rajput Case Forcibly Quarantined In Mumbai Says Bihar DGP News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x