15 December 2024 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या
x

सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी बिहार पोलिसांकडून शोध सुरु

Disha Salian Death, Sushant Singh Rajput Suicide

मुंबई, ३ जुलै : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) आत्महत्या प्रकरणात सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येचे काही कनेक्शन आहे का, हे तपासण्यासाठी पाटणा पोलिसांचे पथक शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात अचानक धडकले. मात्र तपास अधिकाऱ्यांची भेट होऊ न शकल्याने त्यांना खाली हात परतावे लागले.

दिशाने सुशांतकडची नोकरी सोडल्यानंतर त्या दोघांचा कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता. ती सुशांतकडे काम करत होती हे आम्हाला माहित नव्हतं. फार उशीरा ही गोष्ट आम्हाला समजली. ती कधीच तिच्या कामाविषयी कुटुंबीयांशी चर्चा करत नसे. फक्त एकदा तिने सांगितलं होतं की ती सुशांतच्या घरी जात आहे. परंतु, त्या एका भेटीचा आणि त्या दोघांच्या आत्महत्येचा संबंध कसा काय लावता येऊ शकतो? तिने फार कमी काळासाठी सुशांतकडे काम केलं होतं, असं दिशाची आई म्हणाली.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि त्याचा क्रिएटिव्ह कंटेट मॅनेजर असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीने प्रसार माध्यमांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘सुशांत दिशाच्या मृत्यूनंतर खूप अस्वस्थ होता. दिशाच्या मृत्यूची बातमी कळताच त्याला मोठा धक्का बसला होता, त्याने लगेच टीव्ही सुरू केला. यावेळी त्याची बहिण, स्टाफ आणि मी देखील तिथेच होतो. तिच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर तो घाबरला होता, त्याच्या बहिणीने त्याला जवळ घेतले.’

सिद्धार्थच्या मते, ‘दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतला रडू कोसळले होते, त्याच्या बहिणीने त्याला पाणी दिले. तो कुणाला तरी फोन करत होता. तो या घटनेमुळे इतका अस्वस्थ झाला की त्याने मला त्याच्याबरोबर खोलीतच राहायला सांगितले. तो मीडिया दिशाच्या मृत्यूबाबत काय सांगते हे पाहण्यासाठी बातम्या देखील पाहत होता.’

 

News English Summary: A few days before Sushant’s suicide, his ex-manager Disha Salian had committed suicide. So does Sushant’s death have anything to do with his ex-manager Disha Salian’s death? Bihar police are conducting a search in this regard.

News English Title: Disha Salian Death Has No Connection With Sushant Singh Rajput Suicide Claims Her Mother News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x