28 March 2024 10:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

'चला हवा येऊ द्या' वादात, संभाजीराजेंचा मालिका कलाकारांना इशारा

ZEE TV Serial, Chala Hawa Yeu Dya, Sambhaji Raje

मुंबई, १३ मार्च: छोट्या पडद्यावरील विनोदी मालिका ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आला असून राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमाचा एक भाग नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये महाराज सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा मुळ फोटो फोटोशॉप करण्यात आला असून त्याला विनोदी अंगाने दाखवण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमातील कलाकार, निर्माते आणि झी वाहिनी विरोधात संताप व्यक्त केला जात असून झालेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागण्याची मागणी होत आहे. कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही याची दखल घेत ‘माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करू’, असा इशारा दिला आहे.

‘लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे. निलेश साबळे तसेच झी वाहिनी ने या गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

बुधवारी म्हणजेच ११ मार्च २०२० रोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा चूकीच्या पद्धतीनं वापर करण्यात आला. या दिवशाच्या खास कार्यक्रमात सुबोध भावे आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनी ‘विजेता’चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थिती लावली होती. यात छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमेत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळं या प्रकारावर शाहुप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

 

News English Summery: The comedy program ‘Let’s Go’ comes out on the Zee Marathi channel. Because in one part of the program, a photo of Rajarshi Shahu Maharaj and Sayajirao Gaikwad has been used as actors in this series. From this, MP Sambhajiraj Chhatrapati has become aggressive and has warned. ‘The air of popularity got into the head, that man starts acting crazy. The image of Rajarshi Shahu Maharaj and Sayajirao Gaikwad has been used incorrectly in the ‘Let’s air the air’ program. This is not only offensive, but also prohibitive. Nilesh Sable and Zee Wahini should apologize for the wrongdoing. Otherwise, the legal action will be taken against the channel and the director, “Sambhajiraj Chhatrapati has warned. ‘Our family is the patron of the arts. Shahu Maharaj himself transformed Kolhapur into Kalanagar. Sayyajirao Gaikwad’s contribution is no less. Art requires freedom and a nurturing environment. But that doesn’t mean you have to do anything. Sambhaji Maharaj expressed his displeasure at the words of all our history lovers.

 

Web News Title: Story ZEE TV Serial Chala Hawa Yeu Dya Sambhaji Raje Bhosale Sayajirao Gaikawad Shahu Maharaj photo Photoshop.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x