15 June 2021 9:15 PM
अँप डाउनलोड

विधानसभेत मेधा कुलकर्णींचा पत्ता कट केला | आता सांगलीचा उमेदवार देत पुन्हा पत्ता कट

BJP candidates, Vidhan Parishad, graduate constituency elections, Medha Kulkarni

मुंबई, ९ नोव्हेंबर: विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांचा पुन्हा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागी संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरवरून येऊन चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट केला होता. त्यानंतर त्यांना अपेक्षांवर ठेवून वर्षभर झुलवत ठेवलं आणि आयत्यावेळी म्हणजे पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुन्हा सांगलीवरून उमेदवार आयात करून मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करून एकप्रकारे त्यांचं राजकीय प्रवासचं संपुष्टात आणला आहे.

दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली होती. त्यामुळे ही जागा जिंकणे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.संग्राम देशमुख यांना उमेदवारी मिळाल्याने पुणे पदवीधरसाठी चुरशीची लढत होणार आहे.संग्राम देशमुख हे सांगली जिल्ह्यातील मोठे प्रस्थ आहे. साखरकारखाने, सुतगिरणी आणि शिक्षणसंस्था असा त्यांचा कार्यभार मोठा आहे .ते सध्या जिल्हापरिषदेचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे पुणे पदवीधरच्या निवडणुकीत भाजपकडून संग्राम देशमुख हे चंद्रकांत पाटील यांचा वारसा चालवणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

News English Summary: The Bharatiya Janata Party has announced the names of candidates for the Teachers and Graduates constituency of the Legislative Council. Elections for the graduate and teacher constituencies will be held on December 1 and the results will be declared on December 3. Medha Kulkarni’s address has been cut again from Pune graduate constituency. Sangram Deshmukh has been nominated in her place.

News English Title: BJP candidate announced Vidhan Parishad graduate constituency elections News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(625)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x