तुमच्या काळात अनेकांनी धमक्यांचे ऑडिओ-व्हिडीओ क्लिप पाहिले | ते पुन्हा काढायला लावू नका
मुंबई, २८ नोव्हेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही,” अशी तिखट प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी ‘सामना’ला मुलाखत (Saamana Newspaper Interview) दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण दसरा मेळाव्याचं भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचं दिसून आलं, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, फडणवीसांना महाविकास आघाडीतील मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde reply to Devendra Fadnavis) यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक जणांना कशा पद्धतीने धमक्या दिल्या, त्याच्या तत्कालीन काळात अनेकांनी ऑडिओ क्लिप व व्हिडीओ क्लिप पाहिल्या आहेत. ते पुन्हा पुन्हा काढण्यास लावू नका,’ असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांना दिला आहे.आज नगरच्या सरकारी विश्रामगृहावर मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी मुंडेंनी फडणवीस यांनी केलेल्या, ‘महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत,’ या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले, त्यामध्ये त्यांनी धमकावणे कधी केले नाही. पण एखादा व्यक्ती कुठल्या अर्थाने बदनाम होत नाही, त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याची भारतीय जनता पक्षाची पूर्वीपासूनची पद्धत आहे, त्याच आधारावर विरोधी पक्ष नेत्याने मुख्यमंत्री धमकावणारे आहेत, असे सांगितले. पण तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक जणांना कशा पद्धतीने धमक्या दिल्या, ते तत्कालीन काळात अनेकांनी ऑडिओ क्लिप, व्हिडीओ क्लिप पाहिले. ते पुन्हा पुन्हा काढण्यास लावू नका,’ असा इशारा मुंडे यांनी फडणवीस (We have your old audio clips said minister Dhananjay Munde to Devendra Fadnavis) यांना दिला. ‘भारतीय जनता पक्ष किती ताकदवान आहे, हे येणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसेलच,’ असे स्पष्ट करतानाच भारतीय जनता पक्षाला एकप्रकारे आव्हानच दिले.
News English Summary: Minister Dhananjay Munde (Minister Dhananjay Munde reply to Devendra Fadnavis) has replied to Fadnavis. How you threatened many people when you were the Chief Minister, many people have seen audio clips and video clips in his time. Don’t force it to be taken out again, ‘is the warning given by NCP leader and Minister Dhananjay Munde to Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis.
News English Title: Minister Dhananjay Munde reply to opposition leader Devendra Fadnavis over allegations on CM Uddhav Thackeray news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या