9 May 2024 2:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

सूचक इशारा? भाजपच्या 'त्या' चारही उमेदवारांना आशिर्वाद! - पंकजा मुंडे

Pankaja Munde, MLC election 2020, Maharashtra BJP

मुंबई, ९ मे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, त्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव नाही. याचा अर्थ त्यांना पक्षानं डावललं आहे.

काल एकनाथ खडसेंनी त्यांची नाराजी बोलून दाखवली. मात्र पंकजा मुंडेंनी यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. मध्यरात्री एकच्या सुमारास पंकजा मुंडेंनी यावर ट्विट करून भाष्य केलं. ‘आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना, ‘तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपच्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!,’ असं पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची भर पडली आहे. मेधा कुलकर्णी यांनी ट्विटरवर एक शेर पोस्ट केला आहे. त्याचा एकंदर अर्थ पाहता मेधा कुलकर्णी या पक्षावर नाराज असल्याचे दिसते. मेधा कुलकर्णी या कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. मात्र, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने मेधा कुलकर्णी यांना डावलून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी देऊ केली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर काहीसे नाराजीचे वातावरण होते.

अनेक कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ‘उपऱ्या’ उमेदवाराला विरोध केला होता. मात्र, अमित शहा यांनीच मला कोथरूडमधून निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. यानंतर मेधा कुलकर्णी यांनी पक्षादेश शिरसावंद्य मानत नाईलाजाने कोथरूडच्या लढाईतून माघार घेतली होती. मात्र, मेधा कुलकर्णी यांनी आता विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून ट्विटच्या माध्यमातून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

 

News English Summary: Yesterday, Eknath Khadse expressed his displeasure. But Pankaja Munde did not respond. Around one in the middle of the night, Pankaja Munde tweeted and commented on this.

News English Title: Story BJP leader Pankaja Munde reacts after party rejects candidature for MLC election 2020 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x