26 April 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा
x

स्थानिकांना रोजगार द्या | मनसेकडून गाड्या, जेसीबी, सीसीटीव्हीची तोडफोड

Chandrapur MNS, Vehicles office, CCTV, GRN

चंद्रपूर, १७ फेब्रुवारी: सरकारी कोळसा कंपनी WCL अंतर्गत काम करणाऱ्या GRN कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात राज ठाकरे याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज (17 फेब्रुवारी) तोडफोड केली.

स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याच्या मुद्द्यावरून हा राडा घालण्यात आला . वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जीआरएन कार्यालयातील सामानाची मोडतोड करत कंपनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कोळसा कंपनी WCL च्या भटाळी क्षेत्रांतर्गत GRN ही कंस्ट्रक्शन कंपनी कोळसा खोदण्याचे काम करते. या कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याचा आरोप येथील कामगारांनी तसेच या भागातील नागरिकांनी केला होता. या मुद्द्यावरुन मनसेने जीआरएन कंस्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा चौकशी केली. त्यासाठी अनेकदा निवेदनही दिले. मात्र, जीआरएन या कंपनीच्या प्रशासनाने मनसे तसेच स्थानिकांच्या मागणीवर कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तोडफोडीचा आक्रमक पवित्रा घेतला.

 

News English Summary: Raj Thackeray’s Maharashtra Navnirman Sena today (February 17) vandalised the office of GRN Construction Company, which operates under state-owned coal company WCL. The Radha was held on the issue of not providing employment to the locals.

News English Title: Chandrapur MNS vandalised the vehicles office and CCTV of GRN construction company news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x