14 December 2024 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC
x

नाशिक | भाजपचे नाशिक शहराध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला

BJP Nashik, City president Girish Palve, MNS chief Raj Thackery

नाशिक, ०६ मार्च: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. काल राज ठाकरे यांचे विनामास्क नाशकात आगमन झाले त्याची जोरदार चर्चा झाली. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांच्या विवाह सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. यावेळी उदयनराजेंनी फडणवीसांची गळाभेट घेतली. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

दुसरीकडे राज्यात सध्या निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना आता वेग येताना दिसत आहे. यावेळी भाजपच्या नेत्याने हॉटेलमध्ये जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पहिल्या दिवशी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर आज सकाळी भाजपचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे भेटीसाठी पोहोचले. पालवे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि चर्चा केली आहे. पालवे यांच्या भेटीमुळे मनसे भाजपला टाळी देणार का अशा चर्चांना अधाण आले आहे.

 

News English Summary: After meeting party office bearers and party workers on the first day, BJP city president Girish Palve reached here this morning. Palve has met and discussed with Raj Thackeray. Palve’s visit has sparked discussions on whether the MNS will applaud the BJP.

News English Title: BJP Nashik City president Girish Palve meet MNS chief Raj Thackery news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x