26 April 2024 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा
x

'ठाकरे' आडनाव नसते तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते: मंत्री गुलाबराव पाटील

Minister Gulabrao Patil, Raj Thackeray

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते आज संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी जहरी टीका शिवसेनेचे आमदार आणि नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते बोलत होते.

‘राज्याचा कॅबिनेट मंत्री पानवाला आहे. ही किमया वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच केली जाते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाची पार्टी राहिलीच कुठे आहे? ही तुमच्याकडे दिसते तरी थोडी, आमच्याकडे तर लोणच्यालाही नाही. ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. यांचे सरनेम, यांच्या नेत्याचे नाव जर ठाकरे नसते, तर कुठेतरी संगीतकारांमध्ये दिसले असते. त्यामुळे ठाकरे आडनावाचे वलय त्यांच्याकडे दिसत आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

गुलाबराव यांनी यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली. ‘भाजपवाले म्हणतात हे सरकार चालणार नाही? म्हणजे तुम्ही कोणाशीही युती केलेली चालते आणि आम्ही केली की चालत नाही?’, असा सवाल गुलाबरावांनी यावेळी उपस्थित केला. भारतीय जनता पक्ष निवडणुकीत फक्त पैशाचा वापर करते बाकी त्यांच्याकडे दुसरं काही नाही, असा आरोपही मंत्री गुलाबराव यांनी केला आहे.

नाशिकमधील प्रभाग क्रमांक २६ च्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकरराव जाधव यांच्या प्रचारार्थ गुलाबराव पाटील नाशिकमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर हल्लाबोल केला. दरम्यान, काल झालेल्या खातेवाटपादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपद देण्यात आले आहे.

 

Web Title:  Minister Gulabrao Patil criticized MNS Chief Raj Thackeray During Nashik corporation by poll election.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x