16 December 2024 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

#VIDEO: समाजातील प्रत्येक घटक नाराज तरी फडणवीसांचा २४० जागांचा दावा

Maharashtra Vidhansabha Election 2019, CM Devendra Fadnavis, BJP Nashik, EVM, EVM hack, Ballet Paper

नाशिक: मागील काही दिवसांचा विचार करता निवडणुकीची हवा पूर्ण पलटल्याचे दिसत आहे. अगदी रस्त्यावर ते समाज माध्यमांपासून सर्वत्र सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका होताना दिसत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांनी राज्यातील मूळ प्रश्नांना बगल देत सर्वत्र जम्मू-काश्मीर संबंधित कलम ३७० हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा केलं आहे आणि त्यामुळे सामान्यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा लोकसभेप्रमाणे लष्कर आणि इतर भावनिक मुद्यांवरून राजकारण केल्याचा आरोप करत, आम्ही एकदा फसलो मात्र पुन्हा फसणार नाही असं म्हणत समाज माध्यमं देखील भाजप-शिवसेनेवर तुटून पडली आहेत.

दरम्यान, भाजपाला आणि शिवसेनेला या रोषाचा नक्कीच फटका बसणार असल्याचं अनेक तज्ज्ञांनी म्हटलं आहे. राफेल विमान आणि कलम ३७० वरून भाजपने काही स्टंट करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्याचाच अंगलट आल्याने भाजपच्या प्रचाराची गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी खुद्द मुख्यंमत्रीनां प्रचारात प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी रिकाम्या खुच्या असल्याचे व्हिडिओ प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाले आहेत.

मात्र असं असताना देखील नाशिक येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट २४० जागा निवडून येण्याचा दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आधीच विरोधकांनी भाजपवर ईव्हीएम’मध्ये फेरफार करून सत्तेत येण्याचा आरोप केलेला असताना देखील फडणवीस यांनी पुन्हा एवढं नकारात्मक वातावरण असताना असा दावा केल्याने विरोधकांनी पुन्हा प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

#VIDEO: नेमकं काय म्हणाले फडणवीस नाशिक येथील सभेत;

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x