20 September 2021 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Crime Patrol | गुजरातमधील मुंद्रा बंदरातून तब्बल 9 हजार कोटींचे हेरॉइन जप्त Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर राज्यसभा निवडणुकीमार्फत भाजपाची मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी | संजय उपाध्याय यांना उमेदवारी Gold Price | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण | हा आहे आजचा भाव Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस
x

मोदींना मराठा आरक्षणाबद्दल हात जोडून विनंती केली आहे, ते पुढील निर्णय घेतील - संजय राऊत

Maratha reservation

नाशिक , १३ जून | शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी राऊत म्हणाले की, आधीच्या आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाची वाटणी व्हायची. पण आता पाच वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाटी होणार नाही. शरद पवारांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणात हेच म्हटले आहे. आमच्या कुणाच्या मनात अशी शंका नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून वक्तव्य केले. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही काँग्रेसमध्ये नाराजी नाही,असे राऊत म्हणाले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मराठा आरक्षणाबाबत मोदी निर्णय घेतील:
राऊत म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठा आरक्षणाबद्दल हात जोडून विनंती केली आहे. त्यावर आता ते पुढील निर्णय घेतील. विरोधकांनी महाराष्ट्रातल्या वातावरणात गढूळपणा आणू नये. एक मराठा लाख मराठा दिल्लीत दिसायला हवा. ‘मराठा आरक्षण मार्गी लावण्यात काढण्यात येणारा मोर्चा दिल्लीत काढायला हवा. आरक्षणाबद्दल आम्ही हात जोडून विनंती केली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील,’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

वाघाच्या मिशीला हात घालण्याची हिम्मत कुणाचीच नाही:
राऊत पुढे म्हणाले की, आपण महाराष्ट्रातील राजकारणी आहोत. शत्रुत्व टोकाचं नसत, राजकारणात मतभेद असतात. चंद्रकांत पाटील यांना मी चांगल्या भावनेने शुभेच्छा दिल्या. त्यांना सांगू इच्छतो की, वाघाच्या मिशीला हात घालण्याची हिम्मत कुणाचीच नाही, असा टोला त्यांनी लगावला.

 

News Title: Shivsena MP Sanjay Raut talked on Maratha reservation during north Maharashtra tour news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(220)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x