14 November 2019 1:14 PM
अँप डाउनलोड

मराठा क्रांती मोर्च्या आंदोलनात काही पेड लोकं घुसली आहेत: चंद्रकांत पाटील

सांगली : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण आणि मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलनासंदर्भात महत्वाचं भाष्य केलं आहे. सरकारच्या हातात जे होतं ते केलं, आता निर्णय न्यायालयाचा आहे. परंतु काही पेड लोक या आंदोलनांत घुसली असून त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे. कारण त्यांना हे आंदोलन बदनाम करायचे आहे, असं ते म्हणाले.

मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलनातील खऱ्या आंदोलकांनी त्या पेड लोकांना म्हणजे समाजकंठकांना खड्यासारखं बाजूला करायला हवं. तसेच सरकार आंदोलकांसोबत चर्चेसाठी तयार असल्याचं सुद्धा चंद्रकांत पाटील प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. आम्हाला सुद्धा काकासाहेब शिंदेंना जीव गमवावा लागल्याचं दुःख आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आता मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा, परंतु त्यामुळे मराठा समाजाचेच नुकसान होणार आहे आणि आरक्षण हे आता न्यायालयाच्या अखत्यारीत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

हॅशटॅग्स

BJP(415)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या