26 April 2024 6:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

ऑक्सिजनच्या गळतीने २२ रुग्णांचा मृत्यू | पण भाजप नेत्यांना नाशिक महापालिकेत आपली सत्ता असल्याचाच विसर

Nashik oxygen leak

नाशिक, २१ एप्रिल: राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. या रुग्णालयात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 22 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.

रुग्णालयात पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनच्या पाइपमधून गळतीला सुरुवात झाली. आता हे पाइप कापून दुरुस्त करण्यात आले. परंतु, दुरुस्तीच्या कालावधीत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने काहींचा जीव गेला. रुग्णालयात 171 कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर होते. तर 67 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. 22 जणांच्या मृत्यूनंतर आणखी काही रुग्णांची अवस्था गंभीर झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या नाशिक महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे.

दरम्यान, नाशिक महानगरपालेकत भाजपाची सत्ता असली तरी भाजप नेत्यांनी जवाबदारीतून हात झटकले आहेत. एकूण भाजप नेत्यांना नाशिक महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे याचाच विसर पडल्याचं दिसतंय. कारण भाजपचे आमदार अतुल भातखळकर, किरीट सोमैय्या, प्रवीण दरेकर यांना नाशिक महानगपालिकेवर भाजपाची सत्ता आणि त्यामुळे या भीषण दुर्घटनेची जवाबदारी देखील आपली आहे याचा विसर पडला आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. भाजपच्या महापौरांना आणि उपमहापौरांना प्रश्न विचारून त्यांची उचलबांगडी करायची सोडून राज्य सरकारलाच दोष देण्यात धन्यता मानताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेत काहीही घडलं तरी शिवसेनेला लक्ष करणाऱ्या भाजप नेत्यांना नाशिकच्या सत्तेचा विसर पडल्याचं दिसतंय.

 

News English Summary: While there is a shortage of oxygen in the state on the one hand, on the other hand, a shocking accident has taken place at the Zakir Hussain Hospital in Nashik. More than 22 patients are reported to have been killed in the accident. Meanwhile, the fire brigade is currently working to stop the leak.

News English Title: Nashik oxygen leak 22 corona patients dead but BJP leaders are still engaged in politics news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x