18 November 2019 12:21 AM
अँप डाउनलोड

शिवसेनेचे माजी खासदार दिवंगत राजाभाऊ गोडसेंच्या कुटुंबीयांच राज ठाकरें'कडून सांत्वन

नाशिक: शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मुत्रपिंड विकाराने १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पंचवटीतील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते . त्यांचं वय ५९ वर्षांचे होते. कट्टर शिवसैनिक म्ह्णून ओळख असलेले राजाराम परशराम गोडसे हे काही काळ मनसेमध्ये सुद्धा होते.

नाशिक ग्रामीणमधील शिवसेनाचा आक्रमक चेहेरा अशी त्यांची ख्याती होती. शिवसेनेचे १९९३ मध्ये नाशिकला अधिवेशन भरले होते आणि ते अधिवेशन शिवसेनेला सत्तेकडे नेणारे ठरले होते. त्यानंतरच १९९४-९५ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत नाशिकमधून राजाराम गोडसे लोकसभेवर निवडून आले होते. संसरी ते संसद हे त्यांनी आपल्या राजकिय कारकिर्दीवर पुस्तकही लिहीले आहे. सत्ताकाळात त्यांनी संसदेच्या संरक्षण समितीवर काम देखील केले होते.

राजाराम गोडसे यांचावर स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांचा विशेष स्नेह होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सोबत सुद्धा राजाराम गोडसेचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच ते शिवसेनेचे माजी खासदार असले तरी राज ठाकरे यांनी राजकारपलीकडे जाऊन आज नाशिक दौऱ्यावर आले असता आवर्जून कै. राजाराम गोडसेंच्या कुटुंबीयांची सांत्वनासाठी भेट घेतली. त्यांच्यासोबत मनसेचे नाशिकमधील अनेक पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(472)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या