29 March 2024 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार?
x

पुण्यातील आंबेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पास आग

Fire Broke out, Pune Ambegaon, Garbage Waste Management Project

पुणे, १ नोव्हेंबर: आंबेगाव बुद्रुक येथे पालिकेने नव्याने कचरा प्रक्रिया प्रकल्प (Pune waste management issue) उभारण्यात आला असून यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी रविवारी आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द व जांभूळवाडी येथील नागरिकांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. याचवेळी काही नागरिकांनी कचरा प्रकल्पालाचा आग लावल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी कात्रज, सनसिटी आणि कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

कचरा प्रकल्प असल्याने काही क्षणात आगीचे आणि धुराचे लोळ आकाशात पसरले. त्यामुळे परिसरात धुर खूप दूर पर्यंत पसरला आहे. तसेच ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले असून, ही आग नेमक्या कोणत्या कारणास्तव लागली. हे अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच आगीच्या घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत.

यावेळी अग्निशमन दलाच्या 8 फायरगाङ्या व टँकर घटनास्थळी असून आग विझवण्याचं काम सुरू केलं. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस दाखल झाले असून आग कोणी लावली याचा शोध पोलीस घेत आहेत. शहरातला कचरा आणून आमच्या जीवाशी खेळ करू नका असा इशाराही ग्रावस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

 

News English Summary: The municipality has set up a new waste management project (Pune waste management issue) at Ambegaon Budruk, which is spreading bad smell in the area. This has created a health problem for the citizens. A meeting was organized on Sunday on behalf of the citizens of Ambegaon Budruk, Ambegaon Khurd and Jambulwadi to oppose the project. At the same time, some citizens set fire to the waste project, causing a single commotion. Firefighters from Katraj, Sun City and Kondhwa Budruk brought the fire under control.

News English Title: Fire Broke out In Pune Ambegaon Garbage Project News Updates.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x