26 May 2022 8:08 PM
अँप डाउनलोड

वादळ पुन्हा येणार? लवकरच मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या दिशेने?

परळी : मराठा क्रांती मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा येणार पुन्हा येणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या हजारो समर्थकांनी बुधवारी परळी तहसील कार्यालासमोर ठिय्या आंदोलन केले आणि हेच वादळ लवकरच मुंबईच्या दिशेने येतंय काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला होता की, जर मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य नाही केल्या तर मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाऊल ठेऊ देणार नाही. राज्यव्यापी बैठकीत मराठा क्रांती मोर्चाने निर्णय घेतला आहे की मागण्या मान्य न झाल्यास देवेंद्र फडणवीसांना महापूजाही करू देणार नाही.

आगामी निवडणुकीच्या तोंडावर मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा पेट घेतल्यास भाजप आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे पंढरपुरातील महापूजे बाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(220)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x